शिर्डी -सावळीविहीर एमआयडीसीत विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मंत्री ना. सामंत व मंत्री विखे पा. यांचे उपस्थितीत संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी)शिर्डी-सावळी विहीर येथे नव्याने एमआयडीसी  उभारण्यात येत असून या एमआयडीसी मध्ये विविध प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
ना. उदय सांमत यांचे शिर्डीत आगमन होताच त्यांचे स्वागत पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे व युवानेते सुजय विखे यांनी केले तदनंतर त्यांनी श्री साई समाधी मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले .
त्यानंतर साई संस्थानच्या शैक्षणिक संकूलातील भव्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांचे हस्ते तंत्रज्ञान प्रशिक्षण व टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राचा भूमिपूजन समारंभ ऑनलाइन बटन दाबून करण्यात आला.
कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे , आमदार अमोल खताळ, मा.खासदार डॉ.सुजय विखे , श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड,उपविभागीय अधिकारी माणिक आहिरे,टाटा टेक्नॉलॉजीचे सुशीलकुमार, टाटा कन्सल्टन्सीचे समन्वयक प्रितम गांजेवार,राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर,तसेच कैलास कोते,अभय शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी नामदार उदय सामंत यांनी येथे कामे मंजूर करून घेण्यासाठी डॉ.सुजय विखे पा. यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत  नामदार सामंत म्हणाले की डॉ.सुजय विखे माझ्याकडे इतके वेळा आले की मी सुद्धा माझ्या कामासाठी कधी इतका पाठपुरावा केला नाही. कार्यक्षम काम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते त्याची किंमत कालांतराने कळते.
नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे विषयी बोलताना ते म्हणाले की, १९९५ साली मी राजकारणातही नव्हतो त्यांच्यासारख्या सिनियर व्यक्तीबरोबर मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजत असल्याचे मंत्री ना. उदय सामंत गौरवोद्गार काढले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांचे विषयी बोलताना ते म्हणाले की १९९५ साली मी राजकारणातही नव्हतो त्यांच्यासारख्या सिनियर व्यक्तीबरोबर मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजत असल्याचे मंत्री सामंत गौरवोद्गार काढले.यावेळी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डी एमआयडीसीसाठी सावळीविहिर येथील शेती महामंडळाची पाचशे  एकर जमीन शासनाने मोफत उपलब्ध करून दिली असून सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 400 कोटी रुपये तसेच शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि बहुउद्देशीय सभागृहासाठी 100 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.शिर्डी एमआयडीसी मध्ये संरक्षण उद्योगासाठी दोनशे एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून यामुळे सुमारे 3000 स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या एमआयडीसीमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments