टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात सालाबादप्रमाणे परिसरातील नागरिकांसाठी दिवाळी फराळ समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात सर्व व्यापारी, शेतकरी बांधव, कर्मचारीवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बाजार समितीचे संचालक श्री. मयुर अशोकराव पटारे आणि श्रीमती. विद्याताई दाभाडे यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले. फराळ समारंभात विविध पारंपरिक पदार्थ, आनंदी वातावरण आणि उत्सवी रंगत यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.
दिवाळीच्या पारंपरिक आनंदात सहभागी होत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून बाजार समिती परिसरात एकतेचा, सौहार्दाचा आणि आनंदाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
*चौकट:–*
दिवाळी हा केवळ एक उपक्रम नसून परिसरातील शेतकरी, पत्रकार बांधव, व्यापारी, कामगार या सर्व घटकांना एकत्र आणणारा स्नेहबंध आहे. या सगळ्यांच्या एकत्रित श्रमातूनच आपला बाजार फुलतो, म्हणून हा फराळ समारंभ त्यांच्या सन्मानार्थ आपण दरवर्षी आयोजित करत आहोत.
– मयुर पटारे -संचालक, बाजार समिती, श्रीरामपूर.
0 Comments