विद्यार्थ्यांनी दिला आपल्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ वर्षा मंडलिक मॅडम साश्रू नयनांनी निरोप.

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)


 वाकडी खंडोबाची तालुका राहाता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा मंडलिक मॅडम यांचा निरोप समारंभ शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ व पालक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास सात वर्ष मॅडम यांनी उत्कृष्ट काम करून शाळेचे नाव जिल्हा स्तरावर चमकवले विविध स्पर्धा परीक्षा साॅक्लरशिप मध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री उत्तम गोडे यांचाही सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन म्हसे सर यांनी केले तसेच यावेळी सौ निर्मला भालेराव सौ अर्चना आदमाने यांनी आपल्या भाषणात सांगितले की अशा शिक्षिका होणे नाही विठ्ठलराव शेळके यांनी आपल्या प्रमुख भाषणात मंडलिक मॅडम यांनी विद्यार्थी घडवित असताना शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचा परीसरात वृक्षारोपण करून शाळेचे वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न केले यात आम्हा पालकांकडून ग्रामपंचायत मार्फत शासकीय योजना व लोकवर्गणीतून शाळेत सर्व सुविधा मिळवून घेतल्या विकसात मॅडमचा सिंहांचा वाटा आहे असे मनोगतात मांडले सत्काराला उत्तर देताना मंडलिक मॅडम म्हणाल्या की या गावातील सर्वांनी शाळेच्या कामात मदत करून सहकार्य केले कुठल्याही कार्यक्रमाला पालक वर्ग ग्रामस्थ मान्यवर महिला भंगिणी शाळेत हजर राहून आम्हाला मदत केली माझ्या सात वर्षांच्या काळात कुठलाही त्रास झाला नाही विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सांगितले की भरपूर शिका मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांना सांभाळा व गावातील लोकांना जपा असा संदेश दिला माझी बदली ही प्रशासकीय असल्याने मला दुसऱ्या शाळेत रुजू व्हावे लागले मलाही वाईट वाटते या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कोमल मोमले आबासाहेब एलम राजेंद्र शेळके अशोक एनगे सुनिल साबदे अनिल एनगे सचिन घोडके अमोल साबदे अशोक लहारे संजय लहारे सोमनाथ भालेराव मंगेश आहेर गणेश एलम किशोर जगताप सर मनोज तायडे सर सौ सुरेखा शेळके वर्षा जाधव शकुंतला येणगे शिल्पा येणगे रेष्मा घोडके दुर्गा घोडके रंजना आहेर सोनाली आहेर अंगणवाडी मदतनीस सौ शेलार ताई व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते शाळेचे शिक्षक किशोर कुऱ्हे सर यांनी आलेल्या मान्यवर व महिला पालक वर्ग यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments