सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा शाखेकडून आमदार ओगले यांचा शाल-बुके देऊन सत्कार
श्रीगोंदा,दि. २२ ऑक्टोबर २०२५
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांच्या कार्याची दखल घेत श्रीगोंदा येथील पत्रकारांना आमदार हेमंत ओगले यांनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, श्रीगोंदा शाखे तर्फे आमदार ओगले यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले,पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून, समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य ते बजावतात. माझ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत पत्रकार बांधवांचे योगदान अमूल्य आहे. मायभूमीतील हे पत्रकारच माझे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याबद्दलचा स्नेह आणि आपुलकी ही माझ्या जीवनात सदैव द्विगुणित होत राहील.
या वेळी उपस्थितांमध्ये प्रशांत ओगले, ॲड. समित बोरुडे, प्रशांत सिदनकर, कांतीलाल कोकाटे, शांताराम पोटे, सुभान तांबोळी, तसेच आधुनिक लहुजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांचा समावेश होता.
पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, तालुका अध्यक्ष डॉ. अमोल झेंडे, मुख्य सचिव मेजर भिमराव उल्हारे,डिजिटल मिडिया अध्यक्ष किशोर मचे, पत्रकार राजेंद्र राऊत, शफिक हवालदार, जावेद इनामदार, सचिन शिंदे, वैभव हराळ उपस्थित होते.
0 Comments