श्री साईबाबा समाधी मंदिरात 21 ऑक्टोबरला मंगळवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होणार लक्ष्मीपूजन!

सत्तेचा महासंग्राम न्यूज (डिजिटल मिडिया)

शिर्डी( राजकुमार गडकरी)- दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मी पूजन २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीचे श्रीलक्ष्मी पूजन दि. २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहे. पूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने खालील वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
 सायं. ०४.३० वा. – श्री साईबाबांच्या दर्शनासाठीची रांग तात्पुरती बंद राहील.
सायं. ०४.३० ते ०५.०० वा. – पूजनाची तयारी केली जाईल. सायं. ०५.०० ते ०५.५५ वा. –श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मी पूजन पार पडेल.
 सायं. ०६.०० वा. – श्रींची धुपारती होईल.
या पवित्र प्रसंगी श्री साईबाबांच्या भक्तांनी आपले दर्शन नियोजन व वेळा लक्षात घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच पूजन कार्यक्रमादरम्यान संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments