राहाता येथील पंचायत समिती बांधकाम येथील अनिल इंदोलीया यांच्या वर कार्यवाही व्हावी म्हणून छावा ब्रिगेड चे सोमवार पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण.
राहाता पंचायत समिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री अनिल इंदोलीया यांनी शासन भरतीवेळी दिलेल्या कागदपत्राची तपासणी करून त्यांनी केलेल्या कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे म्हणून त्या कामाची कोर टेस्टिंग करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन छावा ब्रिगेडचे राजेश शिंदे पाटील यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे केली होती विभागीय आयुक्त यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग यांना कारवाईची करण्याची नोटीस दिली परंतु आजतागायत कुठलीही कारवाई झालेली नाही इंदोलीया हे संगमनेर येथे कार्यरत असताना काही सामाजिक पदाधिकारी यांनी त्यांच्या विरोधात बऱ्याचशा तक्रारी केल्या होत्या परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही म्हणून श्री शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना निवेदन दिले व दिनांक ८ सप्टेंबर पासून बेरोजगार इंजिनिअर यांना सोबत घेऊन आमरण स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
0 Comments