दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४-- शहरातील श्रीकृष्ण मंदिरासह तीन ठिकाणी वैजयंतीच्या रोपांचे डॉ. संतोष पाटील यांनी आपल्या हरितवारी उपक्रमातुन महंत खडपुलिकर बाबा, दिगंबर दादा, गोपाल गाढवे यांचे सह रोपण केले. भगवान श्रीकृष्ण या वैजयंती च्या बिजा पासुन बनलेली माळ नेहमी डोक्यावर परिधान करत असत. या बिजांना नैसर्गिक रित्या आरपार छिद्र असते. या बिज माळेचा गुणधर्म सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. हे गवत वर्गीय वर्षायू वनस्पती आहे. उत्तर भारतात या बिज्यांच्या पिठाचे सेवन ही करतात व पाने गुरांना चारा म्हणून उपयोगि असतात. विजय प्राप्त करून देणारी म्हणून वैजंती संबोधली जाणारी ही वनौषधी स्त्रियांना गर्भधारणेस मदत करणारी आहे.
-- जैववीविधेतेत योगदान- याच्या पानांचा "कॉनजॉईन स्वीफ्ट" नामक फुलपाखरू होस्ट प्लांट ( अंडी घालून जीवनक्रम सुरु करणे ) म्हणून करतात.तर फुलं मधमाशा यांना आकर्षित करतात.
0 Comments