राजुरी( वार्ताहार )
राहाता तालुक्यातील लोणी बु येथील बाळासाहेब किसनराव वाडेकर यांचे नुकतेच ६७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ भाऊजई एक मुलगा,एक मुलगी, सुन, जावई पुतणे पुतण्या नातवंडे असा मोठा परिवार असून धनंजय बाळासाहेब वाडेकर यांचे ते वडील तसेच सुरेश, दिलीप, किरण, चारुदत्त, दत्ता, निलेश, पंकज धावणे, यांचे ते मेहुणे होते.बाळासाहेब किसनराव वाडेकर हे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना मध्ये चिफ अकाउंटं या पदावर तसेच पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना नौकर पतपेढीचे चेअरमन पदावर काम केले होते.त्यांच्यावर लोणी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रा बरोबर,गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments