हनुमंतगाव मध्ये मोहटादेवी येथून आणलेल्या ज्योतीची भव्य मिरवणूक



लोहगाव ( वार्ताहर)

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्री क्षेत्र मोहटा देवी येथून आणलेल्या ज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील काही तरुण देवीची ज्योत आणण्यासाठी मोहटा देवीला  रवाना झाले होते. हे तरुण पायी चालत देवीची ज्योत घेऊन हनुमंत गावच्या वेशीजवळ आले व गावकऱ्यांनी डीजेच्या तालात या  ज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढली. यावेळी‌ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होऊन नागरिकांनी ज्योतीचे स्वागत केले. 

तसेच गावातील महिलांनी या ज्योतीची विधिवत पूजा करून प्रत्येक दारात आल्यानंतर महिलांनी या ज्योती मध्ये तेल टाकून दर्शन घेतले भर पावसात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने गावामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे , पत्रकार संदीप गावडे, कोल्हार गटाचे भाजप मंडळ उपाध्यक्ष सुभाषराव ब्राह्मणे, मोहटादेवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील अहिरे, बबलू अनाप, वाल्मीक पगारे, अजय गोधडे, अक्षय निंबाळकर, रोहित अहिरे, मनोज निंबाळकर, अमोल अहिरे, समर्थ बर्डे, गौरव घोलप, संजय पाबळे, गोरक्ष अहिरे, जालिंदर अहिरे, संजय पवार, विजय निधाने, सुजय पर्वत, ओम अहिरे, अरुण शिंदे आदी ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments