प्रयत्नवादी राहिल्यास जीवनात मोठे यश मिळते : डॉ. निमसे



ज्ञानज्योती संस्थेच्यावतीने अनाथ, निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप



टाकळीभान प्रतिनिधी- 

जीवनामध्ये थोड्याच यशावर न थांबता प्रयत्नवादी राहिल्यास मोठी संधी मिळू शकते, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाटे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रुक्मिणी माधव मंगल कार्यालयात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेटच्यावतीने अनाथ, निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मा. सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, मा. सभापती डॉ. वंदना मुरकुटे,  संपादक करण नवले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक प्रा. डॉ. अनिल लोखंडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष मंजाबापू थोरात, दत्तात्रय बहिरट महाराज, प्रशासन अधिकारी संजीवनी दिवे, कवी पोपटराव पटारे, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, वात्सल्य मिशन समितीचे बाळासाहेब जपे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्राचार्य जयकर मगर, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर उदघाटन करण्यात आले. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. उपस्थित १०१ अनाथ, निराधार मुलांना शालेय बॅग, शैक्षणिक साहित्य

वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, ज्ञानज्योती संस्थेच्यावतीने समाजात चांगले काम करणाऱ्यांना गौरविण्यात येऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येते व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात येते. त्याचप्रमाणे गरजवंतांना मदत केली जाते. संस्थेचे कार्य समाजासाठी भूषणावह आहे. फाळके म्हणाले की, मनुष्याची ओळख ही त्याच्या कर्मातून होते. जज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे काम समाजसेवेच्या समर्पक भावनेतून उत्तम होत आहे. डॉ. मुरकुटे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षापासून अर्जुन राऊत यांचे सेवाभावी कार्यक्रम आणि प्रेरणा पुरस्कार देण्याचे कार्य सुरु आहे. ते सतत लोकजीवनात मानाचे स्थान निर्माण करीत आहे. डॉ. उपाध्ये म्हणाले की, ज्ञानज्योती या नावात शिक्षणाचा, शिक्षकांचा सन्मान आहे. शिक्षकदिन आणि निराधारांचे जीवन प्रकाशमान व्हावे या उद्देशाने हे उपक्रम म्हणजे कर्मवीर अण्णा, संत गाडगेबाबा, डॉ. बाबा आमटे इत्यादींसारखे महान आहे. संपादक करण नवले यांनी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याचे कौतुक

करून ही संस्था भविष्यात मोठी भरारी घेईल असे सांगितले. राजेंद्र कोकणे यांनी राऊत यांच्या कामाचे कौतुक केले.

संस्थेच्या वतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, अध्यात्मिक धार्मिक, महिला सक्षमीकरण, शासकीय सेवा, कृषी, आदर्श सरपंच, उपसरपंच, स्वच्छ व सुंदर शाळा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. , महेंद्र संत, अमोल पटारे, पत्रकार दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, अनाथ निराधार मुले व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन राऊत, भैय्या पठाण, अक्षय कोकणे, सुदामराव पटारे, दिगंबर मगर, बाळासाहेब सावंत, सुजित बोडखे, भाऊसाहेब गव्हाणे, सौ. पल्लवी अल्हाट, शालिनी ससाणे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे व संगीता फासाटे यांनी केले. आभार अर्जुन राऊत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments