टाकळीभान येथे बस स्टँड व सुलभ शौचालय बांधावे, अन्यथा रास्ता रोको करणारसार्वजनिक बांधकामकडे निवेदनाद्वारे मागणी



      
टाकळीभान : श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर हे गाव वसलेले असताने या ठिकाणी बस थांब्यासाठी बस स्टैंड असणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी बस स्टँडच नसल्याने प्रवाशांना उन, वारा, पावसात रस्त्याच्या कडेलाच ताटकळत उभे राहावे लागते. या कारणामुळे येथील तरूणांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे बस स्टैंड व सुलभशौचालय बांधण्याबाबतचे निवेदन दिले असून यात रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे.


      या निवेदनात त्यांनी नमूद
केले आहे की, टाकळी भान हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावातून तसेच पंचक्रोशीतील अनेक गावातून ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी शिक्षण, नोकरी तसेच इतर दैनंदीन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. स्टँडवर आल्यानंतर बस येईपर्यंत या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टैंड नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी बस स्टैंड होते. मात्र रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली हे बस स्टैंड पाडले गेले आहे. तसेच या ठिकाणी बस स्टैंड मंजूर असतानाही अधिकार्यांच्या चालढकलीमुळे ते होवू शकलेनसल्याचे निवेदनात नमूद
करण्यात आले आहे.
   
   टाकळीभान परिसर विस्तीर्ण असल्याने गावातील लोकसंख्या व विद्यार्थी संख्या प्रचंड वाढलेली आहे. रस्त्याच्या दर्तफा हे विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात. महिला व विद्यार्थीनींची यावेळी प्रचंड हेळसांड होत आहे. तरी साबाने लवकरात लवकर या ठिकाणी बस स्टैंड व सुलभ शौचालय बांधावे, अन्यथा टाकळीभान ग्रामस्थ व विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
       या निवेदनावर काकासाहेब कोकणे, सचिन माने, विकास पटारे, साईनाथ खंडागळे, भाऊसाहेब पवार, बद्रीनाथ पटारे आदींच्या सह्या आहे.

Post a Comment

0 Comments