ग्रामीण भागातील पत्रकार ही खऱ्या अर्थाने वृत्तपत्र माध्यम समूहाची खरी नस--डॉक्टर उदय निरगुडकर

देवश्री नारद पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांचा मानपत्र देऊन शिर्डीत सत्कार !

शिर्डी (राजकुमार गडकरी)- देशात सर्वच क्षेत्रांमध्ये विश्वासहार्यता कमी होत असली तरी सर्वात जास्त चर्चा मात्र पत्रकारितेच्या  विश्वासहार्यतेवर होत असते . कारण इतर क्षेत्रातील विश्वासहार्यतेवर अधिक बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. असे परखड मत  ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.


 शिर्डी-राहता येथील  ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विश्व संवाद केंद्र यांच्यावतीने देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल शिर्डी येथील हॉटेल गोरडीया  मध्ये शिर्डी ग्रामस्थ तसेच सर्व हितचिंतकांकडून त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टर उदय निरगुडकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

 यावेळी दैनिक सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, सहसंपादक प्रकाश पाटील, श्री साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड जंयत जोशी, उद्योजक सुधाकरजी शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर निलेश कोते यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर उदय निरगुडकर म्हणाले की, बातमीमध्ये सत्य व तथ्य महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील पत्रकारितेत सत्य व तथ्य अधिक असते. म्हणूनच ग्रामीण भागातील पत्रकारिता ही या क्षेत्राची नाळ आहे. वृत्तपत्र, माध्यमे ही सामूहिक सामाजिकता व व्यवसायिकता बनली आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिकता व सामाजिकता या दोन्ही गोष्टी सांभाळून चालावे लागते.खरा भारत हा ग्रामीण भागात वसलेला आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील पत्रकारिता ही या क्षेत्रातील खरी नस आहे.  ग्रामीण भागात विविध क्षेत्रात अनेक हिरे आहेत . पण ते प्रकाशात येत नाहीत त्यांना प्रकाशात आणण्याचे काम पत्रकारांचे आहे. ग्रामीण भागातून मोठमोठे शोध लागतात मात्र त्याचा गवगवा जादा होत नाही. हि खंत आहे. असे सांगत पत्रकारितेला रिटायरमेंट नसते. त्यामुळे सतीशरावांनी आपल्या पत्रकारितेतून जसा नावलौकिक मिळवला तो खरा त्यांचा तसेच सकाळ माध्यम समूहाचाही गौरव आहे .असे सांगत त्यांनी हा पुरस्कार सतीश वैजापूरकर यांना मिळाल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन केले. यावेळी सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणवीस म्हणाले की, सतीश राव वैजापूरकर यांचा शिर्डीतील  सत्कार समारंभ हा  या पुरस्कार प्रदान समारंभा पेक्षाही मोठा आहे.

 सतीशरावांनी यापुढेही सकाळ माध्यमात राहून रिटायरमेंटची अपेक्षा धरू नये असे म्हटले.  त्यांना हा पुरस्कार मिळाला म्हणजे सकाळ माध्यमांचाही गौरव असल्याचे ते यावेळी म्हणाले.तर सहयोगी संपादक प्रकाश पाटील यांनी यावेळी अहिल्यानगर या साखर सम्राट यांच्या जिल्ह्यात काम करत असताना निर्भीड पत्रकारिता सतीशरावांनी करत आपली या क्षेत्रातील विश्वासार्हता जपली. ते बातमी पाठवताना त्या बातमीतील सर्व सत्य व तथ्य अगोदरच सांगत असतात त्यामुळे त्यांची बातमी ही घ्यावीच लागते. असे यावेळी प्रकाश पाटील यांनी आवर्जून सांगितले. तत्पूर्वी  शिर्डीचे माजी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी यावेळी आपल्या प्रस्ताविकात बोलताना सांगितले की, सतीशराव एक निर्भीड पत्रकार असून ज्यांनी भल्या भल्यांना आपल्या लेखणीतून केले गारद ! त्या सतीश राव वैजापूरकरांना मिळाला पुरस्कार देवश्री नारद! असे सांगत त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी सतीश राव वैजापूरकर यांनी अनेक विषयावर आतापर्यंत लेखन करून विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांनी सावळीविहीर ते  अ,नगर रस्त्या संदर्भात अनेकदा लेखन केले. दैनिक सकाळ माध्यम येथे आहे तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर येथे आहेत त्यांनी या रस्त्या संदर्भात नक्कीच विचार करून तो सोडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करावा .असे आवाहान यावेळी केले. यावेळी साईसंस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सतीश राव वैजापूरकर हे पत्रकार आहेत तसे आपले मित्रही आहेत. त्यांना हा मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थांनतर्फे अभिनंदन आहे .असे सांगितले. रमेश गोंदकर यांनीही सतीश राव वैजापूरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सतीश राव वैजापूरकर यांनी दैनिक सार्वमत दैनिक लोकसत्ता व सकाळ अधिक वृत्तपत्रात काम केले आहे. शेती पाणी सहकार राजकारण आदी विविध विषयावर त्यांनी सविस्तर अनेकदा लिखाण केले आहे. त्यांच्या लेखणीतून अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे. अनेक प्रश्न समस्या त्यांच्या बातम्यांमुळे मार्गी लागले आहेत. असे सांगितले. या कार्यक्रमानंतर शिर्डी ग्रामस्थ ,पिंपळस ग्रामस्थ तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील तसेच शिर्डीतील पत्रकारांच्या वतीने , हितचिंतकांच्या वतीने व  विविध संस्था, संघटनांच्या वतीने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अभय शेळके, शिवाजी गोंदकर, नितीन कोते ताराचंद कोते ,तुकाराम गोंदकर किशोर गंगवाल ,संदीप पारख, सचिन तांबे, हॉटेल गोरडियाचे चालक निकम, सुजित गोंदकर, डॉक्टर गुंजाळ ,डॉक्टर दोडिया, डॉक्टर गुजराथी, सुनील परदेशी,आदींसह पत्रकार प्रमोद आहेर, रवींद्र काकडे सर, रामभाऊ लोंढे, दिलीप खरात, बाळासाहेब सोनवणे, कोंडीराम नेहे, विजय बोडखे, प्रमोद कुंभकर्ण, आदींसह जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पत्रकार, विविध संस्था तसेच संघटनांचे पदाधिकारी, हितचिंतक यावेळी उपस्थित होते.या  कार्यक्रमानंतर स्नेहभजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments