टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गरजू, होतकरू मागासवर्गीय विद्यार्थीनींना तातडीने सायकलचे वाटप करण्यात यावे. अशी मागणी राष्र्टीय श्रीराम संघ व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या पाच ते सहा महिन्यापासून टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीय निधीतून गरजू व होतकरू मुलींसाठी सायकल आलेल्या असताने त्याचे वाटप आजपावेतो झालेले नाही. तरी सदर मागासवर्गीय निधीतून आलेल्या सायकलींचे तातडीने वाटप करण्यात यावे. जेणेकरून मागासवर्गीय समाजातील गरजू व होतकरू मुलींना त्याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर सदर सायकल लाभार्थींची यादी ही ग्रामस्थ ग्रुपवर टाकण्यात यावी अशी मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुरेश गायकवाड, विठ्ठल जाधव, आप्पा रणनवरे, बाबासाहेब जाधव, लाला मैड, मनोज पवार, योगेश पंडीत, दिपक सावंत, गणेश बोरूडे, गणेश कोकणे, किरण रणनवरे, दत्तात्रय काळे, रवि बोडखे, निखील बोरूडे, गौरव आरणे, पकंज परदेशी, किरण ब्राम्हणे आदींच्या सह्या आहे.
0 Comments