ज्युदो स्पर्धेस कांचन कोळी प्रथम, विभागीय स्तरावर निवडी -



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१६ छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर व्यायाम क्रीडा प्रसारक मंडळ ज्युदो प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित ज्युदो स्पर्धेते सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कांचन चंद्रकांत कोळी हिने ज्युदो स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून विभागीय स्तरावर तिची निवड झालेली आहे. 

कांचन कोळी या विद्यार्थिनीने सोयगाव तालुक्याची नाव उंचावले असून तिच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, कृषीभूषण अरुण सोहनी, आरोग्यदुत डिगांबर वाघ, समाजसेवक दत्तू रोकडे, अंजनाई गो शाळेचे अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोरसे,ईश्वर इंगळे, सुनील निकम,शमा तडवी,राम फुसे,महेश मानकर,शाम पाटील, भगवान कोथलकर, हरीश पाटील,राम सोहनी, पंकज परदेशी,तुकाराम सोनवणे,अनिल चौधरी,राहुल सोनवणे,प्रकाश देसाई,अनिल लोखंडे,अशोक ढगे आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments