लोहगाव वार्ताहर
आदिवासींच्या आरक्षणाला जर लावला धक्का तर भारत बंद करू आख्खा असा गंभीर इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यात बंजारा समाज विरुद्ध आदिवासी समाज असा संघर्ष उभा राहिला आहे.
श्री.अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंजारा समाजाने आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे म्हणून राज्यात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की आदिवासी आरक्षण घ्यायचे असेल तर त्यांनी आदिवासींमध्येच जन्म घ्यायला हवा होता. केवळ आदिवासींना त्रास देण्याच्या उद्देशाने जर तुम्ही हा सर्व उपद्व्याप चालवला असेल तर तुम्हाला जशास तसे उत्तर द्यायला आदिवासी समाज भक्कम आहे. आतापर्यंत आदिवासी समाजाने कोणत्याही समाजामध्ये अतिक्रमण केले नाही किंवा कोणाच्याही हक्काचा वाटा मागितला नाही. जे मिळेल त्यामध्ये आनंदी राहणारा आमचा आदिवासी समाज अतिशय प्रामाणिकपणे जीवन जगत आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा जो परिणाम समोर येईल तो अतिशय गंभीर असेल त्याला सामोरे जाण्याची तयारी बंजारा समाजातील नेत्यांनी त ठेवावी. कारण १९५० पासून ते आजपर्यंत तयार झालेल्या आदिवासींच्या यादीत बंजारा समाजाचा कुठेही उल्लेख नाही. तसेच स्वतंत्र्यापूर्वीही बंजारा समाजाचा कुठेही आदिवासींमध्ये उल्लेख आढळून येत नाही. विनाकारण राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचे काम बंजारा समाज जाणीवपूर्वक करत आहे. ज्या हैदराबाद गॅजेटला पुढे करून तुम्ही आदिवासी असल्याचा दावा करत आहात ते हैदराबाद गॅझेट तुम्ही आदिवासी असल्याचा पुरावा नाही त्याच हैदराबाद गॅजेटमध्येही बंजारा समाज शेतकरी आहे असा उल्लेख आहे. एखाद्या समाजाला आरक्षण द्यायच असेल तर त्यासाठी कायदेशीर समिती लागते असे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, संविधानाचे निर्देश आहेत. आणि गॅजेट संविधांपेक्षा नक्कीच मोठे नाही. ते केवळ एक माहितीपत्रक आहे. गॅजेटच्या नावाखाली आदिवासींमध्ये घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला सडेतोड उत्तर द्यायला आदिवासी समाज सज्ज झाला आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या कोणत्याही गॅजेट नुसार आदिवासींमध्ये घुसता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने बंजारा समाजाच्या दबावाला बळी पडू नये. कारण गेल्या स्वातंत्र्य काळापासून आदिवासी समाजाचा म्हणावा असा कोणताही विकास झालेला नाही. आणि आज आदिवासी समाजाची मुले शिक्षणाची वाट धरत आहेत तर इतर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आतापर्यंत कोणाच्याही हक्काचं हिसकावून घेतलेलं नाही तेव्हा आमच्याही मला बाळाच्या तोंडातला घास जर कोणी हिसकावत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तेव्हा राज्य सरकारने बंजारा समाजातील नेत्यांना वेळीच समज द्यावी व आदिवासी समाजाला होत असलेला मनस्ताप थांबवावा अन्यथा आदिवासी समाजाच्या आरक्षणाला जर तुम्ही धक्का लावला तर राज्यांमध्ये खूप मोठा अगडोंब होईल व या सर्व प्रकाराला राज्य सरकार जबाबदार राहील व त्याची झळ केंद्रापर्यंत जाईल व संपूर्ण देशभरात खूप मोठी क्रांति होईल . कारण गट तट विसरून आता सर्व आदिवासी समाज एक झाला आहे. याचे परिणाम नक्कीच सरकारला भोगावे लागतील असा गंभीर इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी सरकारला दिला आहे.
0 Comments