हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजाला दिशा मिळते - महंत रामगिरी महाराज



श्री क्षेत्र शनिदेव सप्तकुषीत 10 ते 12 लाख भाविकांच्या उपस्थिती १७८  व्या अखंड  हारिनाम सप्ताहाची सांगता.

टाकळीभान प्रतिनिधी- दिलीप लोखंडे 
गंगागिरी महाराज यांनी 200 वर्षीपुवी स्वातंत्र्य पूर्व काळात तरूण व्यसनाच्या आहारी जात होता अशा तरुणांना सप्ताहाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवाहात आणले त्यानंतर मुघल शासन असताना सुध्दा हि परंपरा बंद पडु दिली नाही मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,  मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात असून सप्ताह काळात वीस ते पंचवीस लाख लोकांनी अध्यात्म विज्ञान संस्कृती भजन कीर्तन कृषी प्रदर्शन यामधून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घातली तरच समाजात परिवर्तन घडते असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज१७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून "कृष्णा वेध येली विरहिणी बोले" ह्या  संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील  कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी स्त्री, गोपी चंद्राला पाहून म्हणते की, "हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही." 
या अभंगात, विरहिणी स्त्री कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळता, आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट  केले आहे. रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.  अध्यात्मात आल्यास भजन - किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही .शास्त्र हे नित्य नवीन असुन अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातल्यास मानवी आरोग्यासाठी फार मोठी देणगी आहे.त्यामुळेच युवकानी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो  दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस  म्हणतात दुःख रुपी विश पचवल्या शिवाय सुखाचे लोणी मिळत नाही योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले.
 महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगर्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले मनाची वृत्ती बदलण्याची ताकत फक्त हरिनाम सप्ताह आतच असल्याचे महाराज म्हणाले. महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची बा सांगता करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,,नामदार राधाकृष्णन विखे पाटील,सुदशन चनलचे सुरेश चव्हाणके आमदार रमेश पा बोरणारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,दिनेशभाऊ परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, डॉ, वंदना मुरकुटे, अशोक चे संचालक निरंजन मुरकुटे,आविनाश पा गंलाडे डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह 10 ते 12 लाख भाविकांनी घेतला बुंदी व चिवडाचा महाप्रसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
संत शक्ती मैदानावर उतरले त्यामुळे सगळाचा सुपडासाफ झाला:- व्होट जिहादच आकमण हे हिंदू संसकुतीवर आकमण आहे हे जेव्हा आम्ही रामगिरीजी महाराज व सर्व महाराज यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा सर्व संत महतानी हे आक्रमण परतवून लावले, आध्यात्म समाजाला प्रेरणा देते म्हणून मी सप्हाला पुन्हा येईल संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे की मी पुन्हा येत असतो . योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह पाहून मला त्या अथांग महासागराप्रमाणे येथील भाविकांचा महासागर पाहून मी भारावून गेलो, संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे की मी पुन्हा पुन्हा येत असतो मी महाराजा नाही सांगतो की मी पुन्हा पुन्हा या सप्ताह येणार कारण मुठभर लोकांनी ओट जीहाद पुकारला होता परंतु महंत रामगिरीजी महाराज सारख्या साधू संतांनी आमचे सरकार तारले आहे त्यांच्या आशीर्वादाने या सरकारचे काम चालू आहे शनिदेव गाव येथील उच्च पातळीचे बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू होईल व श्री क्षेत्र गोदाधाम साराला बेटाचा 109 कोटीचा विकास आराखडा असेल आमचे सरकार ते करण्यास सकारात्मक व कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यावेळेस म्हणाले.

छाया -दिलीप लोखंडे,

Post a Comment

0 Comments