साजनभाऊ नागरे यांची सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रदेश संघटक पदी निवड !



राहाता ( प्रतिनिधी ) राजकुमार गडकरी 
येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले  साजनभाऊ नागरे यांची सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्रदेश संघटक पदी निवड झाली आहे. यापूर्वी ते , त्यांनी अनेक सामाजिक संघटनेत कार्य केले आहे,
त्यांची निस्वार्थ सेवा आणि संघटनेतील योगदानाला पाहून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सारिका ताई नागरे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री दत्तात्रय दहिवाळ महाराज दत्त दिगंबर पीठ लाडगाव छत्रपती संभाजी नगर* यांचा आशीर्वादाने ही निवड झाल्याबद्दल बोलताना डॉ. सारिका ताई नागरे यांनी साजन नागरे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दील्या ,
संस्थेचे प्रदेश अध्यक्ष श्री. संदिप दादा मानकर आणि   मुक्ताताई डहाळे, राजेंद्र कुलथे, श्री. संतोष सोनार, श्री. श्रीराम उजेंकार, श्री. नारायण देशमुख , संजय तळेकर , प्रशांत टाक , संजय सोनार साहेब पुणे, स्वातीताई मुंडलीक, हरीभाऊ मंडलीक,गुरुनाथ बोराडे, गोकुळ चिंतामणी , मेजर शेवंते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, शंकर, सोनवण, सोमनाथ आहेर पा,सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी साजन नागरे यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या,
साजन नागरे यांच्या या नवीन जबाबदारीमुळे संस्थेच्या कार्याला निश्चितच अधिक गती मिळेल, यात शंका नाही. असे मनोगत, सुवर्ण भरारी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे यांनी व्यक्त केले,, साजन नागरे यांचा या यशाबद्दल राहाता तालुका परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments