दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- महसूल अधिकारी अशोकराव चितळकर उल्लेखनीय कामाबद्दल महसूल दिनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ, पंकज आशिया यांचे हस्ते व, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आमदार संग्राम जगताप, प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ यांच्यासमवेत प्रदान करणेत आला.
अशोक नंदा रावसाहेब चितळकर हे मौजे भोकर कमालपूर, घुमनदेव, कमालपूर तसेच (अतिरिक्त कार्यभार खिर्डी, वाँगी, गुजरवाडी व कारेगाव )मध्ये 1 आगस्ट 2024 ते 31 जुलै 2025 या महसूली वर्षात एक उत्तम प्रशासक व कार्यक्षम शासन प्रतिनिधी म्हणून विविध उद्दिष्ट व जबाबदाऱ्या पार पाडण्यात उल्लेखनीय योगदान दिले. सन 2024 - 2025 वर्षात खिर्डी, वाँगी व गुजरवाडी ह्या गावांमधील दुर्लक्षित आदिवासी, भटक्या विमुक्त समाजातील घरोघरी जाऊन शिधापत्रिका वाटप केले.
त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे स्वतः जुळवून परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासन स्तरीय योग्य पाठपुरावा करून अगदी घरपोहोच 145 लोकांना घरपोहोच शिधापत्रिका दिली. त्याचप्रमाणे शासनाच्या ई पिक पाहणी सारख्या महत्वकांशी प्रकल्प शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून 100% पिकाच्या नोंदी करून घेतल्या. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतर्गत आर्थिक, सामाजिक, व शारीरिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या घटकापर्यंत पोहचुन लाभ मिळवून दिला.
शासनाच्या निवडणूक , शासकीय वसुली, ई चावडी प्रकल्प , अश्या महत्वाच्या कामात उत्कृष्ट योगदान दिले.शासनाचा जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून शासनाची प्रतिमा उचवण्यात महत्वाचे योगदान दिले. त्यांच्या ह्या कार्यामुळेच त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्राममहसूल अधिकारी म्हूणन मा. जिल्हाधिकारी यांचे हस्ते गौरविनेत आले...याआधी त्यांना सन *2021- 22* ह्या महसूली वर्षाचा *उपविभागीय स्थरावरील "* *उत्कृष्ट तलाठी "* म्हूणन गौरविनेत आले होते.
तसेचनुकतीच त्यांची श्रीरामपूर तालुका ग्राम महसूल व मंडळाधिकारी संघटनेच्या "अध्यक्ष" पदी नेमणूक झाली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांचे अभिनंदन केले जात आहे,
0 Comments