संतांनी सर्वसामान्य जनतेला ईश्वर प्राप्तीसाठी दिला भक्तीचा सोपा मार्ग --ह भ प संजय जी महाराज जगताप,


गोंडेगाव येथील काल्याच्या कीर्तनातून केले अध्यात्मिक प्रबोधन


शिर्डी ( प्रतिनिधी) संतांनी सर्वसामान्य जनतेसाठी ईश्वर प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर व सोयीचा केला असून संतांच्या उपदेशाप्रमाणे भक्तीच्या मार्गाने गेलं तर नक्कीच जीवनात ईश्वर प्राप्ती होईल. असे प्रतिपादन हभप संजय महाराज जगताप (भऊरकर) यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता दिनी काल्याच्या कीर्तनातून ते विविध दृष्टांत देत निरूपण करताना बोलत होते.   


                ये दशे चरित्र केले नारायणे ।
रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते ।
पुढे ही बहु ते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे ।
केला नारायणे अवतार॥३॥
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा काल्याचा अभंगावर अनेक दृष्टांत देत हभपसंजय महाराज जगताप यांनी निरूपण करताना पुढे सांगितले की,
काला म्हणजे जीवाचा भगवंताशी संबंध जोडणे याला योग म्हणतात. वास्तविक जिवाचा भगवंताची वियोग कधीच होत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात;
तुका म्हणे कैची किव।
कोठे जीव निराळा ।।
परंतु गंमत अशी झाली की जीवाने भ्रमाणे देहाला मी मानले, व तो देवापासून विन्मुख झाला. त्याला भगवंताशी एकरूप व्हायचे तर त्याला भक्तीचे सहाय्य मिळायला पाहिजे. ते मिळवण्याकरता;
चरित्र ते उच्चारावे ।
जे देवी गोकुळी केले ।।
भगवंताने गोकुळात अवतार कार्य केले त्याचाच उच्चार करावा. भगवंताने गोकुळात ज्या लीला केल्या त्या आश्चर्यकारकच आहेत.
संतांनी वर्णन करताना म्हटले आहे;
नवल केवढे केवढे ।
न कळे कान्होबाचे कोडे ।।
त्यांच्या ज्या लीला आहेत, त्या कर्तृम, अकर्तृम, अशा आहेत.
ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वर्णन करताना म्हणतात;
जो देवकी वसु देतास्तव झाला।
कुमारीसाठी गोकुळी गेला ।
तो मी प्राणासकट पियाला पुतणेने।।
(ज्ञानेश्वरी. १०/ २८८)
न उघडता बालपणाची फुली।
जेनेमिया अदावणी सृष्टी केली।
करी गिरी धरूनी उमाणीली।
महेंद्र महिमा ।।
(ज्ञानेश्वरी १०/२८९)
कालिंदीचे हृदय शल्य फेडीले।
जेने मिया जळत गोकुळ राखले वासुरासाठी लावली ।
विरंचीस पिसे ।।
भगवंताने बालपणीच अनेक राक्षसांचा नाश केला. इंद्राचा गर्व हरण केला आणि गोकुळाचे रक्षण केले. ब्रह्मदेवा सुद्धा वेड लावले,म्हणून तुकाराम महाराज प्रथम चरणात म्हणतात,
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ।।
भगवंताने ज्या वयात हे कार्य केले, ते कोणीही किती मोठा असेल तरी तो करू शकत नाही. इतक्या लहान वयात गैर असल्या तरी ते भगवंत आहेत ते कोणती गोष्ट करतात. त्यांना काही पण अशक्य नाही. भगवंताने रामावतारात अगदी चरित्र केले, त्याचे अनुकरण सामान्य जीवन करू शकतो अशी आहे आणि ते नक्कीच करावे. जीवनात तसे आचरण करावे म्हणूनच त्यांनी राम अवतारात जे कार्य केले, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात.

परंतु कृष्ण अवतारतील कार्य हे जीव कोटीतील कोणीही करू शकणार नाही, म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे फक्त गुणगान करावे त्याचे आचरण करायचे नाही. त्यांच्या लिलांचे वर्णन करावे . राम अवतार लीला आचरणात आणल्याने मानवाला पुण्याचा लाभ होतो, परंतु कृष्ण अवतारातील लीला उच्चार ल्याने पुण्याचा लाभ होतो. हा फरक समजून घ्या. भगवंताच्या अवताराचे प्रयोजन गीतेत सांगितले आहे,आपली भारत भूमी महान आहे या भूमीमध्ये मातृदेवो भव पितृ देवो भव अतिथी देवो भव आचार्य देवो भव असा भाव या भारतभूमीमध्ये व्यक्त केल्या जातो अशा या भारत भूमीमध्ये अनेक भगवंताचे अवतार झालेले आहेत भगवंताचे अनेक अवतार झालेले असले तरी पण भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार झालेला आहे त्या भगवान कृष्ण परमात्म्याने श्रीमद् भगवद गीता ही महान देणगी दिलेली आहे तसेच अनेक संतांची या भारतभूमीमध्ये अवतार झालेत त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्धन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले वजानिष्काम भक्ती उपासना म्हणजे भगवंताची साक्षात पूजाचा आहे म्हणून संप्रदायातील सर्व संतांनी आपल्या वाटेला आलेले जे कर्म आहे त्या कर्माला साक्षात ईश्वराची पूजा त्यांनी मांडली जसे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात भगवान परमात्म्याला कोणत्या प्रकारची पूजा आवडते तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली हो या पारा तोशा लागीभगवान परमात्मा निष्काम भक्तीने जेवढा प्रसन्न होतो तेवढा सकाम भक्तीने होत नाही काही न मागे कोणासी तोचि आवडी देवासीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया वारकरी संप्रदायाच्या विचाराचे मंदिर पहिले ज्ञानेश्वर महाराजांनी उभारले व अठरापगड समाजातील सर्व संत महात्म्यांना बरोबर घेऊन भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती उपासना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली या संत मालिकेमध्ये संत नामदेव महाराज संत गोरोबाकाका संत सावता माळी संत नरहरी सोनार संत सेना महाराज सकलसंतांना बरोबर घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी किर्तन परंपरा व वारकरी संप्रदायाची उपासना या मार्गातून सांगितलीवारकरी संप्रदायातील सर्व संत आपल्या आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्या कर्मातच भगवंताला पाहतात जसे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपरा तोशा लागीप्रत्येक संताने स्वतःच्या वाट्याला जे कर्म आले त्या कर्मातच ईश्वराची पूजा त्यांनी मांडली जसे आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे संत सेना महाराज भगवान पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होतेसंत सेना महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते एकदा पंढरीच्या वारीला गेलेले असताना चंद्रभागेचे स्नान केले. स्नान के केल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात पूजा करत बसले पूजा वगैरे सर्व विधी आटोपला व भगवंताची पताका खांद्यावर घेतली आणि निघाले पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोलाकार दगडी शिरगोळा सापडला आणि सहज उचलून आपल्या पिशवीमध्ये घेतला भगवान पांडुरंगाच्या मंदिरासमोर संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेतले आणि आत मध्ये गाभाऱ्यात आल्यानंतर गरुड हनुमंताची दर्शन घेतले गरुड कामाला आलिंगन दिले आणि भगवान परमात्म्याच्या मूर्तीकडे जात असताना सेना महाराज प्रत्येक वेळेला भगवंताच्या दर्शनाला आलेले असताना भगवंत स्वतः खाली बघत असे आणि या वेळेला सेना महाराज दर्शनाला आले तर भगवंत एकटक समोरच बघत होते सेना महाराजांना कळून चुकले आपल्या भावभक्ती मध्ये काही बदल झालाम्हणून भगवान परमात्मा आपल्याशी एकरूप पणे बघत आहेत भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि साष्टांग दंडवत घातला आणि भगवंताशी बोलू लागले भगवंताने सांगितले सेना महाराज तुमचे माझ्यावर भक्तीचे जे ऋण होते ते भेटले सेना महाराजांनी विचारले कशाप्रकारे भगवंताने सांगितले चंद्रभागेच्या वाळवंटातील आपण एक शिरगोळा घेतला तो कशा करतात आपल्या वस्तऱ्याला धार येण्याकरता म्हणून माझ्या पंढरी मधील तुम्ही कोणतीही वस्तू घेतली तर माझ्यावर तुमच्या भक्ती सेवेचे रूम राहत नाही म्हणून मला निष्काम भक्त आवडतो सकामभक्त आवडत नाही म्हणून वारकरी संप्रदायाच्या सर्व संत महात्म्यांनी भगवान पांडुरंगाची निष्काम भक्ती स्वीकारलेली आहे. असे शेवटी त्यांनी कीर्तनात निरूपण करताना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक वारकरी भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments