लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील महाराष्ट्र बँकेच्या वाकडी शाखेचे स्थलांतर करू नये, अन्यथा तीर्व स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
यासाठी बँके समोर वाकडी ग्रामस्थ, शेतकरी,व्यापारी, महिला बचत गट यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा डेप्युटी अधिकारी वर्षा कुल , बँक मॅनेजर तनपुरे वाकडी शाखा अधिकारी रोहन अहिरे , यांच्या उपस्थितीत गावातील बँक स्थलांतराचा निषेध म्हणून वाकडी गाव पुर्ण बंद ठेवून बैठक झाली. सर्वांनी बँक स्थलांतर करू नये,असा आग्रह धरला. यावेळी शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके ,सरपंच रोहिणी ताई आहेर,अण्णासाहेब कोते,भाऊसाहेब शेळके, वसंतराव लबडे बापूसाहेब लहारे,सुनील लहारे,सुभाष कापसे, ज्योती शेळके,रवींद्र शेळके, मच्छिंद्र भवार, सुनिता शेळके,संदीप पंत लहारे, आदमने मॅडम, सुनील कुरकुटे, बाबासाहेब शेळके, , सौ. कापसे ताई,विजय शेळके,मच्छिंद्र खरात, इत्यादींचे भाषणे झाली.शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अनिल शेळके, रमेश लहारे,अमोल शेळके, नितीन येलम, प्रमोद येलम, ज्ञानदेव शेळके, संदीप बळगट, अक्षय साबळे, बंटी गोरे, राजेश शेळके,बी एम लहारे, बी .एल आहेर, महेश एलम,शंकरराव लहारे सावळेराम आहेर, प्रमोद एलम,नारायण शेळके,आनंद आहेर, तात्यासाहेब गोरे,आनिल पांडागळे, दिलीप लहारे, गंगाधर नारंगिरे, ऍड अतुल लहारे, दिंगबर कोते इ.अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल उपस्थित होते . गावातील अनेक मान्यवर,महिला बचत गटाच्या सर्व खातेदार हजर होते. यावेळी बँकेचे तनपुरे साहेब यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सौ. वर्षा कुल यांनी बँकेचे धोरणावर मनोगत व्यक्त करताना अनेक नागरिकांनी आम्हाला काही सांगू नका.नागरिकांनी आमच्या येथील बँक शाखा स्थलांतर करू नका असा आग्रह धरला. यावेळी मॅडम म्हणाल्या,तुमच्या भावनेची सहानुभूतीक विचारू करुन वरिष्ठापर्यंत कळविण्यात येईल . यावेळी विठ्ठलराव शेळके यांनी सांगितले की,आम्ही बँक स्थलांतर करण्यास विरोध करून आम्ही बँक स्थलांतर होऊ देणार नाही. आम्हाला आठ दिवसात कळवा अन्यथा तीर्व स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी बँकेवर राहील याची नोंद घ्यावी.
तसेच शेवटी महाराष्ट्र बॅकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष जाधव यांनी सांगितले की मी या शाखेत अनेक वर्षे काम केले या गावातील सर्व खातेदार शेतकरी व्यापारी छोटे मोठे व्यवसाय करणारे युवक यांनी योग्य वेळी कर्ज फेड केली आहे परंतु सरकारने कर्जमाफी करू असे आश्वासन दिले यामुळे शेतकरी बंधू कर्ज फेड करत नाही मी वसुली साठी मदत करेल तरी शाखा चितळी येथे स्थलांतर करू नये अशी विनंती करतो.
0 Comments