दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०१ - सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे हरितयोद्धा, शेतकऱ्यांचे राजा, आणि आधुनिक सरकारपद्धतीचे स्थापक होते. त्यांच्या कृषी धोरणांमुळे मराठवाडा-विदर्भात क्रांतिकारी बदल झाले, आणि राज्यशासनात पंचायती राज, पर्यावरण, उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रांतही मापदंड बदलल्याचे डॉ. दिनाजी खंदारे यांनी सांगितले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन अग्रवाल, डॉ. शीतल डोके, डॉ. झाकी, श्रीमती गीता घाडगे, सोनाली झिंजे, सपना मिसाळ, गोविंद जोशी, सुनील वानखेडे, मोरे, कारके, आकाश चावरे, कैलास पाटील, शेख हबीब आदींची उपस्थिती होती.
0 Comments