रविवारी सकाळी सावळी विहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिरात भजन झाल्यानंतर ह भ प सुरेश महाराज जपे, आगलावे सर,सौ. आगलावे ताई , हभप सचिन महाराज आदींच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे श्रीक्षेत्र पुणतांबाकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. रुई मार्गे शिंगवे फाट्यावरून पुणतांबा येथे पोहोचल्यानंतर रात्री पुणतांबा येथे मुक्काम झाला. सोमवारी सकाळी गोदास्नान व श्रींचे दर्शन होऊन व विविध धार्मिक कार्यक्रम आणि फराळाचा कार्यक्रम होऊन या पायी दिंडी वारीची समाप्ती झाली. या पायी दिंडीमध्ये भजनी मंडळ तसेच वारकरी, भाविक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments