दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-मंथन सामान्यज्ञान 2025 परीक्षेत जि.प.प्राथमिक केंद्र शाळा टाकळीभानच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पालकांच्या इच्छेनुसार या परीक्षेत 57 विद्यार्थी सहभागी होतात. परीक्षेची चांगली तयारी करून यश संपादन करतात. नुकताच या परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम डावखर लॉन्स श्रीरामपूर या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी पालकांसह अनेक यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.
. या कार्यक्रमात जिल्हा परिषद टाकळीभान शाळेचे अनेक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या परीक्षेत इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी कुमारी आसावरी सोमनाथ शिंदे हिने केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी श्री दीपक बनकर यांनी केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता तिसरीचा गौरव संतोष वाघुले याने केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला तर इयत्ता तिसरीच्याच कुमारी स्वरा गणेश बनकर व कुमारी त्रिवेणी विनायक बोरुडे यांना केंद्र स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला.इयत्ता चौथीचा शिवम गजानन जाधव याने केंद्र स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामस्थ,पालक वर्गातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पटारे , शिक्षक कुमार कानडे, यशवंत गागरे, राजेंद्र बनकर शिक्षिका संगीता उंडे, सुनिता जाधव, उज्वला पाचरणे,जया चव्हाण, उज्वला शेळके,ज्योती गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments