लोहगाव वार्ताहर
राहाता तालुक्यातील लोहगाव तिसगाव प्रवरानगर परिसरात रात्रीच्या वेळी आकाशामध्ये एक नव्ह दोन नव्हे तर तीन चार ड्रोन फिरताना दिसत आहे .त्यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कित्येक ठिकाणी डाळिंबाच्या चोऱ्या झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच या ड्रोन मुळे परिसरात प्रत्येक गावात चर्चेचा विषय बनलेला आहे. या संदर्भात संबंधित विभागाने सखोल चौकशी करून नागरिकांची भीती दूर करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
रात्रीच्या वेळी आकाशात हे ड्रोन फिरताना दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे या संदर्भात संबंधित विभागाने ड्रोन संदर्भात नागरिकांची माहिती देऊन भिंती दुर करण्यात यावी.
0 Comments