दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18 -- सोयगाव येथे दि.19 शनिवारी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा व सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास शिवसेनाचे जिल्हाप्रमुख (उ.बा.ठा. ) तथा नवनिर्वाचित संचालक राजेंद्र राठोड, शिवसेना ( शिंदे ) उपजिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित संचालक प्रभाकर काळे, सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे तसेच सोयगावच्या नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, शिवसेना सिल्लोड तालुकाप्रमुख मारोती पा. वराडे, सोयगाव तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण आदींची उपस्थिती असणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज शनिवारी सोयगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी एक वाजता या शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments