केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या दादरा नगर हवेली, दमण व दिवचे आणि लक्षदीप चे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत घेतले साई दर्शन!


राजकुमार गडकरी ( शिर्डी)

शिर्डी ( प्रतिनिधी)केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण व दिव तसेच लक्षद्वीपचे माननीय प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

 साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल हे निस्सिम साईभक्त असून ते नेहमी शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतात.

Post a Comment

0 Comments