मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावेत आणि महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे वेळेवर आणि उपलब्ध करून द्यावीत--- प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक

शिर्डी( प्रतिनिधी) मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावे व महाराष्ट्रावर सदैव साईंची कृपादृष्टी राहावी. अशी साईबाबा चरणी मनोमन प्रार्थना केल्याचे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगत  "कितीही ठरवलं तरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणं होत नाही. जोपर्यंत साईबाबांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत.  साईबाबांचं बोलवणं आल्यामुळं शिर्डीत येणं झालं आहे. 


 साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला शांती आणि समाधान मिळालं."असं
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रसाद ओक यांनी सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी साईबाबांची मूर्ती शाल प्रसाद देऊन संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार केला पुढे बोलताना ते म्हणाले की,"आज साईबाबांचं बोलवणं आल्यामुळं शिर्डीत येणं शक्य झालं. विशेष म्हणजे आज श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार असल्यानं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मन अगदी भारून आलं आहे. साईबाबांच्या मूर्तीकडे पाहून असं वाटतंय की, साईबाबा काहीतरी मोठा आशीर्वाद देत आहेत. सध्या परिस्थिती सर्वत्रच बिकट आहे. सर्वांना उत्तम आरोग्य साईबाबा देवो प्रत्येकाच्या घरात भरपूर धन अन्नधान्य असू दे. महाराष्ट्रात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी नांदावी. हीच परंपरा कायम राहो आणि साईबाबांची कृपादृष्टी महाराष्ट्रावर सदैव राहो. मागील काही दिवसांपासून कला क्षेत्रावरही मोठं संकट ओढावलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावेत आणि महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे वेळेवर आणि उपलब्ध करून द्यावीत." असं ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments