सोयगाव भाजप तालुका उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड--



दिलीप शिंदे सोयगाव 
 सोयगाव दि.16 सोयगाव नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष योगेश हरिभाऊ पाटील यांची भाजपा च्या सोयगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

    माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी योगेश हरिभाऊ पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असे घोषित केले. या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून व फटाके वाजवून आनंद साजरा केला. या निवडीबद्दल अल्पसंख्याक मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे, जयप्रकाश चव्हाण, तालुका अध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, अनिल खरात, बद्री राठोड, जिल्हा सरचिटणीस वसंत बनकर, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, नगरसेवक राजेंद्र जावळे,सुनील गावंडे, सुनील ठोंबरे, राहुल राठोड, मंगेश सोहणी, मयूर मनगटे, मोतीलाल वाघ ,संजय मंडवे, दत्तू ढगे, संजय चौधरी,दिलीप पाटील, अमृत राठोड, प्रमोद पाटील, संजय तायडे, समाधान आगे,संजय आगे, सिताराम पाटील,अजय पाटील आदींनी अभिनंदन केले आहे..

Post a Comment

0 Comments