भारतीय लहुजी सेना कुठल्याही क्षणी उपोषन सुरु करण्यार नगर पालिकेला इशारा






श्रीरामपुर( प्रतिनिधि ) नंदकुमार बगाडे 
      शहर नगर पालिका हद्दीतील वार्ड नंबर 1 साई नगर खबड्डी परिसर मंदिर चर्च, कब्रस्तान परिसर,या ठिकानी कोंबडीची घाण ,मेलेले जानवरे , गाय म्हशीचे घाण व इतर घाण आणून टाकल्याने परीसरातील नागरीकांचे आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने तातडीने कारवाई व्हावी व शहराती मोकाट जनावरांचा  बंदोबस्त करावा या साठी भारतीय लहुजी सेनाच्या वतीने मा उपमुख्यधीकारी ताकपीरे साहेब याना निवेदन देण्यात आले .


सदर निवेदन देण्यासाठी भारतीय लहुजी सेनाचे  राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, रमजान शेख, रोशन भाभी , राजेन्द्र त्रिभुवन,रमिज पोपटीया ,सिंकदर तांबोळी,अनवर शाहा ,आदी कार्यकर्ता उपस्थित होते,
  तातडीने कारवाई व्हावी अन्यथा भारतीय लहुजी सेना तसेच परीसरातील नागरीक कुठल्याही क्षणी उपोषन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments