संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी आश्विन पाटील याची एमपीएससीतून महसूल सहाय्यक पदावर निवड



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.22 संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगावचा माजी विद्यार्थी आश्विन पाटील याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)  मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून " महसूल सहाय्यक" या पदावर यशस्वीरीत्या निवड मिळवली आहे. ही निवड स्पोर्ट्स कोटा अंतर्गत झाली असून, ही बातमी संपूर्ण महाविद्यालय व अजिंठा शिक्षण संस्था परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.आश्विन पाटील याने बी.ए. पदवी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून पूर्ण केली असून तो वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्य राखत त्याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ नाना काळे व सचिव प्रकाश दादा काळे यांनी आश्विनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे  प्रा. दिलीप बिरुटे, प्रा. भास्कर टेकाळे, डॉ.विक्रम भुतेकर, डॉ ज्योती आधाने आणि क्रीडा विभाग प्रमुख डॉ. निलेश गाडेकर यांनीही आश्विन पाटील याचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments