दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.19 -- शेती हा उद्योग व्हावा यातून शेतकऱ्याचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्यशासन विविध उपक्रम व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती , खरेदी विक्री संघ यासारख्या शेतकऱ्यांशी निगडित सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी दिली
.पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की ,सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सोयगाव येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिनिंग प्रेसिंग लवकरच सुरत होत आहे. त्यासोबतच कंकराळा येथे धारणा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज ,शेतमाल प्रक्रिया केंद्र देखील सुरु होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बनोटी येथे उपबाजाराचा विकास साधण्यासाठी निधीची उपलब्धता करून देऊ त्यासोबतच सावळदबारा येथे देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार साठी जागा उपलब्ध झाल्यास येथे ही निधी उपलब्ध करून देवू.
दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात महसूल, ग्रामविकास ,कृषी विभाग ,जलसंधारण इत्यादी शासकीय विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, व करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य वेळी निर्णय जाहीर करतील असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा व सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती तसेच संचालकांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती सोयगाव - सिल्लोड च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उबाठा) राजेंद्र राठोड यांनी पक्षभेद बाजूला ठेवून बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आली तर राजकारण करावं पण निवडणुक झाल्या की कुठलेही राजकारण न करता लोकांची कामे केली पाहिजे असे मत आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिल्लोड बाजार समितीत एकत्रीकरण केल्याने बाजार समितीला चांगले दिवस आले. निधी अभावी कुठलेही सुविधा येथे नव्हती, सिल्लोड च्या बाजार समितीतून सोयगाव बाजार समिती येथे विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपलब्ध करून दिला. आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने विकासाच्या माध्यमातून सोयगाव तालुक्याचे रूप बदलत असल्याचे राजेंद्र राठोड आपल्या भाषणात म्हणाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदासाठी माझ्यावर विश्वास टाकला. या विश्वासाला कुठेही तळा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देत राजेंद्र राठोड यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरमसिंग चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक विश्वास दाभाडे यांनी तर शेवटी नंदकिशोर सहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रभाकर आबा काळे ,केशवराव पाटील तायडे आदींनी उपस्थितांना संबोधित केले.
व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना उबाठा चे जिल्हाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन रंगनाथ वराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर आबा काळे, माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, देविदास पा. लोखंडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे ,उपसभापती संदीप राऊत, शिवसेनेचे (उबाठा ) तालुकाप्रमुख दिलीप मचे, माजी सभापती रामदास पालोदकर, शिवसेना तालुका प्रमुख मारुती वराडे, धरमसिंग चव्हाण, गोपीचंद जाधव , नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, द्रुपताबाई सोनवणे, सुरेखाताई तायडे ,सुशीलाबाई इंगळे, सुमनबाई तांगडे, बंडू काळे, रमेश साळवे, नजीर अहमद, लक्कुसिंग नाईक ,राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर ,हनिफ मुलतानी ,खरेदी विक्री संघाचे संचालक संजय निकम, सुभाष बोरसे, मुरलीधर वेहळे, भगवान लहाने, राधेश्याम जाधव, गुलाबसिंग पवार, चंदाबाई राजपूत, प्रतिभा सोळंके, भारत तायडे ,मोतीराम पंडित तसेच कृउबा समितीचे संचालक केशवराव पाटील तायडे श्रीरंग साळवे जयराम चिंचपुरे दामू अण्णा गव्हाणे कौतिकराव मोरे नानासाहेब रहाटे नंदकिशोर सहारे सतीश ताठे दारासिंग चव्हाण राजाराम पाडळे रमेश लाठी भाऊराव लोखंडे शेख जावेद हे उपस्थितीत होते तर कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडके ,गटनेता अक्षय काळे ,नगरसेवक कबीर शहा ,संदीप सुरडकर, राजेंद्र दुतोंडे ,भगवान जोहरे ,शेख रउफ ,गजानन कुडके, बंटी भोळ ,किशोर मापारी ,लतीफ शहा ,विष्णू इंगळे, नारायण घनगाव ,अशोक खेडकर ,कुणाल राजपूत ,फिरोज पठाण ,विलास वराडे, रमेश गवंडे ,अमोल मापारी ,दिलीप देसाई ,समाधान भोळ ,उस्मान खान पठाण, शेख सलीम, विक्रम चौधरी, निजाम पठाण ,राजू देशमुख, इस्माईल कुरेशी, पांडुरंग गवळी, परमेश्वर जिवरग आदींसह तालुक्यातील विविध सेवा सोसायटीचे चेअरमन ,संचालक , आजी-माजी लोकप्रतिनिधी परिसरातील शेतकरी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments