राहाता (प्रतिनिधी)
हिम्मत असेल तर यापुढे फायनान्स कंपनीने आदिवासी भिल्ल समाजाच्या घरांचा ताबा घेऊनच दाखवा अशा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी फायनान्स कंपन्यांना दिला आहे.
ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की काही फायनान्स कंपन्यांनी जिल्ह्यात अतिशय उच्चाद मांडला आहे. आदिवासींना तटकुंची रक्कम देऊन नंतर तुम्ही हप्ते फेडण्यास असमर्थ आहात असे दाखवून त्यांच्या घराची निलाव पद्धतीने विक्री केली जाते व तत्काळ त्या आदिवासीला बळजबरीने घराच्या बाहेर काढले जाते. व ही सर्व प्रक्रिया पूर्व नियोजीत असते. असे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात देखील या फायनान्स कंपनीने दादागिरी करून आदिवासी कुटुंबाला बेघर केले आहे. आणि ज्या आदिवासीने घर सोडलेले नाही त्यांना तर दररोज दमबाजी करून या कंपनीच्या माजलेल्या सांडांनी फोन करून मनस्ताप दिला आहे व तुम्ही जर घर खाली केले नाही तर तुमचे बिऱ्हाड रस्त्यावर फेकू अशी धनकी दिली जात आहे. परंतु आता ही दादागिरी सहन केली जाणार नाही. यापुढे जे फायनान्स कंपनीचे अधिकारी आदिवासी घरांचा बेकायदेशीर ताबा घ्यायला येतील त्यांना अगोदर एकलव्य भिल्ल सेनेच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल. यापुढे कोणत्याही भिल्ल समाजाच्या कुटुंबाला बेघर कराल तर तुम्हाला संघटनेची ताकत दाखवून देऊ. यापुढे जे अधिकारी भिल्ल समाजाच्या घरांचा ताबा घ्यायला येतील त्यांची इथेच धुलाई गेली जाईल व त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता यापुढे फायनान्स कंपनीने कोणत्याही भिल्ल समाजाच्या कुटुंबाला त्रास देऊ नये अन्यथा तसे निदर्शनास आल्यास त्या पदाधिकाऱ्यांनी पुढील तयारी ठेवूनच आदिवासींच्या घरांकडे यावे. तुम्ही कितीही ताकद लावा तुम्हाला पुरून उरण्यासाठी आमचे आदिवासी वाघ तैनात आहेत. तेव्हा आदिवासींना विनाकारण त्रास देऊ नका अन्यथा याचा विस्फोट झाल्यास याचे खूप गंभीर परिणाम समोर येतील. तरी आदिवासींना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपनीने वेळीच सावध व्हावे व आदिवासींची बळकवलेली घरे त्यांना परत करावीत. अन्यथा आदिवासींच्या रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.व हिम्मत असेल तर आदिवासींच्या घरांचा ताबा आता घेऊनच दाखवावा अशा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
0 Comments