टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी




टाकळीभान प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक बी.व्ही .देवरे  ,ए .ए . पाचपिंड , श्रीमती डी . ए पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते .

   कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक   आर . एम .शिंदे , पर्यवेक्षक एस .एस . जरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष बी .व्ही . देवरे ,प्रमुख वक्ते  संदिप जावळे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बी .व्ही देवरे म्हणाले की , लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अमूल्य असून त्यांचे कार्य देशातील लोक कधीच विसरणार नाही .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संदिप जावळे यांनी लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील प्रेरणास्त्रोत होते असे सांगून त्यांनी भारताला  स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांमध्ये  स्फूल्लिंग पेटवले  असे सांगितले . यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धार्थ शिंदे ,कु.दिव्या पैठणपगारे , कु . श्रेया शिंदे ,कु. अलिशा भैलिमकर ,कु .संस्कृती निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले .
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . पलक कोकणे हिने तर आभार कु . श्रद्धा शेरकर यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments