क्रांतिकारी रामोशी समाजाबद्दल आ. सोनवणे यांनी केलेल्या वक्तव्याचा नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने जाहीर निषेध!

शिर्डी (प्रतिनिधी) क्रांतिकारी रामोशी  व फासेपारधी  या समाजाबद्दल जुन्नरचे आमदार शरद  सोनवणे यांनी ‌ चुकीचे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ  निर्माण होईल असे वक्तव्य केले असून त्याचा संपूर्ण राज्यात क्रांतिकारी रामोशी व फासेपारधी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त होत आहे.


 जुन्नर चे आमदार  शरद सोनवणे यांनी क्रांतिकारी रामोशी समाज व फासेपारधी समाज हा चोरटा असून त्याला पायदंड घालण्यात यावा. असे जाहीर पत्रकारां समोर वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण राज्यात क्रांतिकारी रामोशी समाज संतप्त झाला असून आमदार‌ शरद  सोनवणे यांनी समाजाची जाहीर माफी मागावी. अन्यथा क्रांतिकारी रामोशी समाज आमदार शरद  सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात क्रांतिकारी रामोशी समाजाचे राज्यव्यापी प्रतिनिधित्व करणाऱ्या नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे की ,जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांनी क्रांतिकारी रामोशी समाजाबद्दल जे वक्तव्य केले ते निषेधार्थ असून आमदार सोनवणे हे महाराष्ट्रासारख्या विधान मंडळात आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांना माहिती असायला हवे की, क्रांतिकारी रामोशी समाज हा देशभक्त राष्ट्रभक्त आहे. छत्रपतींच्या काळामध्ये क्रांतिकारी रामोशी समाज हा बहुतांशी गडरक्षणाचे, रखवालदारीचे काम इमानदारीने करत होता. क्रांतिकारी रामोशी समाजाच्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांनी 14 वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. देश स्वतंत्र्यासाठी पहिला फासावर जाणारा क्रांतिकारक उमाजी राजे नाईक आहेत. अशा राजे उमाजी नाईकांचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात गुप्तहेर प्रमुख असणाऱ्या बहिर्जी नाईक यांचा क्रांतिकारी रामोशी समाज देशभक्त राष्ट्रभक्त आहे आणि हि  देशभक्ती‌ या  क्रांतिकारी रामोशी समाजाच्या रक्तारक्तात भिनलेली आहे. संपूर्ण देशात, राज्यात एक प्रामाणिक, इमानदार म्हणून क्रांतिकारी समाजाकडे पाहिले जाते आणि असे असताना आमदार शरद सोनवणे यांनी कोणताही अभ्यास किंवा विचार न करता तसेच राष्ट्राचे संविधान लक्षात न घेता थेट क्रांतिकारी रामोशी व  पारधी या समाजावर थेट चोरटा समाज म्हणून आरोप केले आहेत .त्याचा आम्ही नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत .क्रांतिकारी रामोशी समाजाची जाहीर माफी आमदार सोनवणे यांनी मागावी अन्यथा त्याचे प्रायचित्त  नक्कीच आमदार सोनवणे यांना भोगावे लागेल असा इशाराही नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे युवा अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव चव्हाण यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आमदार सोनवणे यांच्या वक्तव्याचा क्रांतिकारी रामोशी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनीही आमदार सोनवणे यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी .त्यांना समाजाची माफी मागण्यास भाग पाडावे .अन्यथा क्रांतिकारी रामोशी समाज राज्यात आमदार सोनवणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव चव्हाण यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments