सावळीविहीर बुद्रुक येथील श्री लक्ष्मी माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

शिर्डी ( राजकुमार गडकरी)-- ‌‌राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील कारवाडी भागात असणाऱ्या प्रसिद्ध श्री लक्ष्मीमातेचा यात्रा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यात्रेनिमित्ताने मंदिर व सभा मंडपात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी कोपरगाव येथून लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या युवकांनी पायी आणलेल्या गोदा जलाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर गोदा जलाने श्रीं. लक्ष्मी मातेला स्नान घालण्यात आले. नंतर पूजन अभिषेक करण्यात आला. दिवसभर येथे आषाढ मंगळवार असल्यामुळे व यात्रेनिमित्त भाविकांची विशेषता महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत होती. सायंकाळी वृंदावन च्या ह भ प अंकिताताई माने यांचे सुश्राव्य असे जाहीर कीर्तन झाले.



 या  कीर्तनातून ह भ प अंकिताताई माने यांनी सांगितले की जग काळ देव जिंकला पाहिजे, जो जग काळ देव जिंकतो तो ईश्वरचरणी समरसच झालेला असतो. जग जिंकले तर संपूर्ण विश्वावर राज्य करता येऊ शकते. काळ जिंकता आला तर मृत्यूवर विजय मिळतो आणि देव जिंकता आला तर देवाची कृपा होते व देवाच्या कृपेनेच आपण भजन, कीर्तन पूजन करतो व त्यातूनच परमात्म्याकडे जाऊ शकतो. म्हणून पांडुरंगाची कृपा व्हावी भगवंताची, भगवतीची कृपा व्हावी त्यासाठी नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण केल्याने अनादि निर्गुण भवानी प्रगटल्या शिवाय राहत नाही. असे सांगत मलाही श्री पांडुरंग, श्री साईबाबा व श्री जंगली महाराजांची कृपा झाली म्हणून येथे कीर्तनाला येता आले.


 मागील वेळी कीर्तनाला येणे शक्य झाले नव्हते तेव्हा ह भ प पल्लवी ताई घोगरे यांना कीर्तनासाठी पाठवले होते मात्र यावेळेस योग आला व येथे किरण, सचिन,व  किशोर आगलावे व ग्रामस्थांच्या मुळे कीर्तनाची संधी मिळाली. असे सांगत संतांची देवाची कृपा जीवनात कायम राहावी म्हणून चांगले आचरण , नामस्मरण करा. असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी वेळेत वेळ काढून हभप अंकिताताई माने ह्या येथे किर्तनाला आल्या . त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कीर्तनानंतर -उपस्थित प्रसिद्ध कीर्तनकार हभप प्रतिक्षाताई व प्रसिद्ध भजन गायक नकुल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळ सुखदेव जपे यांनी संपूर्ण यात्रेतील भाविकांसाठी महाप्रसाद , राजेंद्र परसराम आगलावे यांनी मंदिर व सभा मंडपाला जागा दिली. सागर गोकुळ जपे हे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाल्याबद्दल तसेच अशोक गोरख जपेही माजी सैनिक हे  ग्राम महसूल आधिकारी झाल्याबद्दल, व किरण बबनराव जपे माजी सैनिक या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भजनी मंडळी व आणखी काही मान्यवर व दानशूर व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून येथे दहा लाख रुपये खर्च करून सभा मंडप झाल्याबद्दल सरपंच ओमेश जपे यांनी सांगत ग्रामस्थांच्या वतीने विखे परिवाराचे त्यांनी आभार मानले.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनाला व सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मी माता मित्र मंडळ, ग्रामस्थ, भजनी मंडळ ,यांनी विशेष परिश्रम घेतले.

मंदिरासाठी सभा मंडप दिल्याबद्दल विखे पा. परिवाराचे ग्रामस्थांच्या वतीने आभार- सरपंच ओमेश जपे.


Post a Comment

0 Comments