टाकळीभान येथील शर्त भंग झालेल्या शेतजमिनी भूमिहीन भिल्ल समाजास वाटप करा

ज्ञानेश्वर अहिरे 
टाकळीभान येथील शर्तभंग झालेल्या शेतजमिनी पुनःगृहीत करून त्या जमिनी त्याच शर्तीवर मिलिटरी सैनिक अर्ध सैनिक तसेच भूमीहीन आदिवासी भिल्ल समाजास वाटप कराअशी मागणी माजी सैनिक संपतराव मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
   ‌.         जिल्हाधिकाऱ्यांना ‌दिलेल्या निवेदन संपतराव मोरे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गावातील जवळपास २५ नागरिकांना शासनाने नवीन शर्तीने कसवण्यासाठी जमिनी दिल्या आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व मिलिटरी सैनिक यांचा समावेश आहे या शर्तीनुसार या जमिनीची वाटणी करणे, गहाण ठेवणे, पट्ट्याने देणे, अगर ‌जमिनीच्या‌ कोणत्याही भागावर बोजा चढवणे तसेच जमिनीची तबदिली करायची नाही ‌ असा आदेश शासनाचा आहे. या शर्तीचा भंग झाल्यास त्यांना दिलेल्या जमिनी काढून घेतल्या जातील व त्यांनी जमिनीत केलेल्या सुधारणा बाबत नुकसान भरपाई मिळणार नाही अशा अटी घालण्यात आल्या आहेत. परंतु संबंधित स्वातंत्र्य सैनिकांच्या जमिनीत अशोक सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात आहेत. तर काहींनी कायम खरेदी करून दिली आहेत तर काही साठे खत करून देण्यात आल्या आहेत. आणखी इतरही अनेक व्यवहार झाले आहेत त्यामुळे शासनाने दिलेल्या जमिनीची शर्तभंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर जमिनीचा मोठा अपहार झाला आहे. तरी शासनाने या सर्व जमिनीची एक समिती नेमून चौकशी करावी व शर्तभंग झालेल्या सार्व जमिनी शासनाने ताब्यात घ्याव्यात व या सर्व जमिनी मिलिटरी सैनिक, नीम लस्करी सैनिक, भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजास‌ वाटण्यात यावी अशी मागणी संपतराव मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
              दरम्यान सदर निवेदनाची प्रत एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांना देण्यात आली असून सदर प्रकरणात विशेष लक्ष घालणार असल्याचे ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments