राजकुमार गडकरी
डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. शिर्डी मध्ये शिवपुराण कथा 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान होणार असून त्यासाठी जागा निश्चित झाली आहे. नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अस्तगाव माथ्यावर ही शिवपुराण कथा होणार आहे. सुमारे आठ लाख भाविकांचे नियोजन येथे होणार असून शिर्डी व परिसरातील सर्व घराघरांमध्ये या संदर्भात पत्रिका वाटप करण्यात येणार असून त्यावर बारकोड नुसार इच्छुक स्वयंसेवकांसाठी फॉर्म राहणार आहे. तो फॉर्म भरून दिल्यानंतर स्वयंसेवकाचे काम करण्याची संधी मिळणार आहे.
त्याचप्रमाणे परिसरातील सर्व भाविकांना रुद्राक्ष यावेळी देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी निघणारी मिरवणूक ही शिर्डीतून काढण्याचा आपला प्रयत्न आहे. असे त्यांनी सांगितले. प्रसिद्ध शिवपुराण कथा आता अस्तगाव माथ्यावर होणार हे निश्चित झाले आहे.व शिर्डी आणि परिसरातील शिवभक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments