दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी:- श्रीरामपूर- वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या राज्य मार्ग क्र.२१६ गोदावरी नदीवर पुलाचे काम पुर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही महांकळवाडगांव बाजुने प्रलंबित रस्त्यांचा जमिनी हस्तांतर प्रश्न सुटल्याने,आ.रमेश बोरनारे यांनी तातडीने ३ कोटी ७५ लाख रूपये निधी मंजूर करून आणून आज महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या रस्त्याचे कामास शुभारंभ झाला.
या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की आपल्या परिसरात शनिदेवगांव सप्तक्रोशित १७८वा सप्ताह होत आहे. गोदावरी नदीवरील राज्य मार्ग क्र.२१६ वरील हा नागमठानचा चांदेगांवचा हा पुल सुरू होणे गरजेचे होते. वैजापूरचे आ.रमेश बोरनारे यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या प्रयत्नाने या कामास ३ ंकोटी ७५ लाख रूपयांचा भरिव नीधी मिळाला आहे. वांजरगांव बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे भरावं वाहुन शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान होत होते. या बंधऱ्याचे कामास १३ कोटी रूपयांचा निधी आणून साईडने मजबूत आरसीसी काँक्रिट तटबंदी केली. सप्ताह परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू केली आहे. सप्ताह स्थळाजवळील कमालपूर बंधारा हा पूल नसुन पर्यायी व्यवस्थेचा मार्ग आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कमालपूर बंधाऱ्याचे तातडीने मजबुत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. नागमठान पुल रस्ता जमिन संपादन महत्वाचा प्रश्न होता. जमिनीचा मोबदला न मिळताही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास जमिन अधिग्रहण करून दिली. या शेतकऱ्यांसमवेत सराला बेट येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत शेतकऱ्यांना जमिन म़ोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तयारी दर्शविली.. एकदा गेलेली जमिन पुन्हा होत नाही.या शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य मोबदला मिळणार आहे. या नागमठान पुलासह बेटावरील पुलाचे काम कॉन्ट्रॅक्टर लहामगे यांनी केले असुन त्यांच्या कामाचा दर्जा उत्तम आहे.योगायोगाने आज शुभारंभ झालेल्या रस्त्याचे काम त्यांना मिळाले आहे. सप्ताह सुरू होण्यापूर्वी ते पुर्ण करणार आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले की या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. त्यांच्या बेटावरील बैठकीस मी उपस्थित होतो. महंत रामगिरी महाराज त्यांना म्हणाले सप्ताह सुरू होणया अगोदर रस्त्याचे काम सुरू करायचे आहे. तुम्ही जमिन देण्यास संमती द्या शासनाकडून मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो.हा महाराजांचा शब्द या शेतकऱ्यांनी पाळला अन् आज प्रत्यक्षात महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते कामास सुरूवात झाली. बेटाचा भक्त या नात्याने १७८ व्या सप्ताह काळ पर्वणी अगोदर या सप्ताह स्थळाकडे येणारे मोठमोठे रस्ते पुर्ण करण्याचे भाग्य मला लाभले. महालगांव ते चेंडुफळ ,नागमठान ते गाढे पिंपळगांव मांजरी पर्यंत. नागमठान माळी घोगरगांव, महालगांव शिरसगांव हमरापूर अवलगांव पूल हे रस्ते पुर्ण केले.,सप्ताह निमित्ताने पाच कामे मी हाती घेतली होती. सप्ताह स्थळापासुन शनैश्वर मंदीरापर्यत भव्य दिव्य ४० फुट रूंदीचा रस्ता सुरु आहे. नवे,जुने बाजाठान पीरवाडी या रस्त्याचे कामास सुरुवात केली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे सप्ताह स्थळ पाहणीसाठी आले. त्यावेळी त्यांनी कमालपूर बंधारा मजबुतीकरण काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हे काम पुर्ण झाले असुन श्रीरामपूर भागातून सप्ताह स्थळी येणारे परिसरातील रस्त्यांची कामे तातडीने करणार आहेत.
या रस्ता शुभारंभ कार्यक्रमास अहिल्यानगर भाजपाचे (उत्तर) जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पवार, उदयसिंह पवार,भाऊसाहेब झिंर्जुडे, डॉ प्रकाश शेळके, राजेंद्र गलांडे, नामदेव घोगरे,राहुल दातीर नानासाहेब वानखेडे दत्तात्रय चोरमल, वैजापूर सार्वजनिक बांधकाम सहा.अभियंता रोडगे, सहा अभियंता भारती, भानुदास विखे, रामनाथ तांबे,बद्री चव्हाण, गणेश तांबे डॉ गोकुळ चाहें,जगन्नाध काळे,सुदाम कुरकुरे, प्रशांत चव्हाण, कृष्णा जोशी योगेश वाढे, भिमाशंकर तांबे, मधु महाराज,योगेंद्रगिरी महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, किशोर थोरात, दादासाहेब तोडमल,मेघळे गुरूजी , भाऊराव भराडे, महांकळवाडगांव,नागमठान,चांदेगांव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सुत्रसंचलन पवन चव्हाण यांनी केले.
चौकट..
जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे हस्ते विधीवत पुजन
महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते सत्कार
महांकाळवाडगांव शिवारातील नितीन व प्रवीण,उत्तमराव गोडसे, मायाताई किशोर सोमवंशी, रागिणी लक्ष्मण भागवत, अनिल व सुनिल रंगनाथ खुरूद, पुरूषोत्तम आण्णा गांगुर्डे,फुलाबाई आण्णा गांगुर्डे, मुश्ताक अहमद नुर महमंद शेख, गणेश व गोकुळ प्रभाकर खुरूद,बाळू लक्ष्मण खुरूद, चांदेगांव बाजुचे धीवर या सर्व शेतकऱ्यांचे हस्ते गुरूंनी विधीवत पूजा केली.या सर्व शेतकऱ्यांचा व त्यांना एकत्रित करण्यात परिश्रम घेतलेल्या विठ्ठल सोमवंशी यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला,
0 Comments