लोहगाव (वार्ताहर): राज्यात सीईटी, नीट आणि जेईई या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नियमितपणे इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावीसाठी सीईटी, नीट आणि जेईई परीक्षांच्या तासिका सुरू आहेत. या तासिकांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स या विषयांचे आठवडाभर एम.सी.क्यू.च्या धरतीवर अध्यापन करून आठवड्यात दर शनिवारी चाचणी परीक्षा (टेस्ट सिरीज) घेतली जाते. अध्यापनातील आधुनिकता, इंट्रॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व व्हाईट बोर्डचा वापर आणि विविध संगणकीकृत सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास समजावून घेणे सोपे झाले आहे. याशिवाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी शिक्षकांकडून नेहमीच समस्यांचे निराकरण आणि समुपदेशन केले जात आहे. सीईटीसाठी राबवलेल्या या विशेष पॅटर्नमुळे या कनिष्ठ महाविद्यालयाचा गत वर्षापासून उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी याचा फायदा होत आहे, अशी माहिती प्राचार्य विनायक मेथवडे यांनी दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या महाविद्यालयातील सीईटीसाठी ४४ विद्यार्थी, नीटसाठी १० विद्यार्थी आणि जेईईसाठी ०५ विद्यार्थी प्रविष्ट झाली होती. त्यामध्ये सीईटी पीसीबी ग्रुपमध्ये महाविद्यालयात साक्षी गणेश खर्डे ९६.०१ टक्के प्रथम, आशिष चंद्रकांत माळी ९१.४० टक्के द्वितीय तर अमृता विजय कारंडे ९०.६८ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. पीसीएम ग्रुपमध्ये सोहम वसंत पवार ८९.४९ टक्के प्रथम, कुणाल रामदास खर्डे ८६.९२ टक्के द्वितीय, कार्तिक ज्ञानेश्वर वाघ ८६.२४ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये १५ विद्यार्थी ८० टक्के पेक्षा अधिक आहेत. जेईई परीक्षेत तेजस संजय काकडे ९५.९९ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. तर नर्सिंग सीईटीमध्ये किरण हरीश कसबे हा विद्यार्थी ८१.५७ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना बारावी सीईटी प्रमुख विश्वास मोहिते, अकरावी सीईटी प्रमुख विठ्ठल म्हसे, देवेश आहेर, जवाहरलाल पांडे, सागर निगुडे, योगिता निघुते, प्रियंका लोंढे, दीप्ती रुपवते, अरुण कुळसुंदर, सुवर्णा भोर, शाहिस्ता शेख, अंजुम तांबोळी, उपप्राचार्य अलका आहेर व परीक्षा प्रमुख डॉ. शरद दुधाट यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे, जनरल बॉडी सदस्य बी.जी. आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, माधुरी वडघुले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी, पालक आणि सर्व समितीतील सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments