राहुरीतील आणीबाणीच्या काळातील नेत्यांच्या वारसांना सन्मान समारंभाचे निमंत्रणच नाही

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत अटक होऊन १९ महिने नाशिक येथील तुरुंगात कारावास भोगणाऱ्या आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ लढा देणाऱ्या राहुरी तालुक्यातील नेत्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने झालेल्या सन्मान समारंभात विसर पडल्याची खंत समाजवादी नेते कै. साथी हौशीनाथ लोहार- पोपळघट यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर पोपळघट यांनी व्यक्त केली आहे.
    याबाबत पत्रकात पोपळघट यांनी म्हटले, की आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र देऊन संघर्षयात्रींचा सन्मान करण्यात आला; परंतु या सन्मान समारंभासाठी राहुरी तालुक्यातील बहुतांश नेत्यांच्या वारसदारांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे राहुरीचे आमदार भाजपचे असूनही त्यांच्या तालुक्यातील या लढवय्यांचा सन्मान समारंभात उल्लेखही न होणे, ही बाब अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे.
      ज्ञानेश्वर पोपळघट यांनी याबाबत सांगितले की, त्यांच्या वडिलांसह अनेक नेत्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतलेला असतानाही या समारंभासाठी कोणतीही माहिती दिली गेली नाही.
राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या सन्मानपत्र सोहळ्यात प्रशासनाने दिलेल्या यादीप्रमाणेच निमंत्रणे देण्यात आल्याचे तालुकास्तरावरून सांगण्यात आले. तथापि, याच तालुक्यातील काही मिसाबंदींना मागील वर्षी म्हणजेच २५ जून २०२४ रोजी राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. परंतु यावर्षी नगरमधील कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण दिले गेले नाही.
   आणीबाणीच्या काळाअहमदनगर
जिल्ह्यातही वातावरण सरकारविरोधी निर्माण झाले होते. यामध्ये साथी हौशीनाथ लोहार, राजाभाऊ झरकर, अविनाश आपटे, मोरोपंत उपाध्ये आदींचा सहभाग होता. बेलापूरसारख्या तालुक्यांतील अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी होते. अहमदनगर येथील गांधी मैदानावर झालेल्या सभेदरम्यान भाषण करत असताना साथी हौशीनाथ लोहार यांना अटक करण्यात आली. त्यांना नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर मोरोपंत उपाध्ये, नेवासकर मामा, वसंतसा लक्ष्मणसा पवार यांनाही अटक करण्यात आली व त्यांनाही नाशिक येथे हलवण्यात आले होते, असे त्यांनी पत्रकात सांगितले.

Post a Comment

0 Comments