सोयगाव बसस्थानकावरील पत्रे उडून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, जैसे थे वैसे स्थिती, प्रवाशांचे हाल--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.28  वादळी वाऱ्यात सोयगाव बसस्थानकावरील सिमेंटचे पत्रे उडून सोळा दिवसांचा कालावधी लोटला असून अद्यापही बसस्थानकावरील छतावर  परिवहन महामंडळाकडून पत्रे बसवण्यात आली नसल्याने पावसामुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.आगार प्रमुखांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव शहरासह परिसरात दि.11 जून रोजी रात्री वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली होती. जोरदार आलेल्या वादळी वाऱ्यात सोयगाव बसस्थानकावर असलेली सिमेंटचे पत्रे उडाली होती. सोळा दिवसांचा कालावधी लोटला असून अद्यापही बसस्थानकावरील छतावर सोयगाव आगाराकडून पत्रे बसविण्यात आली नाही.
बसस्थानकाची स्थिती जैसे थे वैसी आहे. पावसाळ्याचे दिवस असून पाऊस सुरू झाल्यावर बसस्थानक पत्रे नसल्याने गळते त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड देत इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. सोयगाव बसस्थानकावरील परिवहन महामंडळाकडून  छतावर पत्रे केंव्हा बसवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments