शिर्डी (प्रतिनिधी) साधूंचे जीवन हे केवळ वैराग्य आणि ध्यान यापुरते सीमित नसते. साधूंचे त्रिसूत्री कर्तव्य हे ईश्वर चिंतन, विश्वकल्याण आणि धर्म प्रचार-प्रसार व रक्षण या तीन स्तंभांवर उभे असते. धर्म हा केवळ पंथ, पूजा किंवा कर्मकांड नव्हे, तर तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. धर्म रक्षण म्हणजे केवळ एखाद्या देवळाचे संरक्षण नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या चारित्र्य, आचरण आणि परंपरांचे रक्षण करणे होय. असे मत महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,आजच्या या युगात धर्मावर अनेक आघात होत आहेत . कधी विधीसंहितेच्या नावावर, कधी सांस्कृतिक आक्रमणाच्या माध्यमातून, तर कधी समाजातील उदासीनतेमुळे. अशा स्थितीत धर्म रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे हे प्रत्येक साधू, संन्यासी, आणि जागरूक हिंदूचे कर्तव्य आहे
या धर्मकार्याच्या भावनेतून आज मी मुंबई मंत्रालय गाठत आहे. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हा धर्मासाठी लढणाऱ्या, श्रद्धा टिकवणाऱ्या आणि हिंदू संस्कृतीसाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. धर्म रक्षणार्थ, हिंदू समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी, आणि परंपरांच्या संरक्षणासाठी ही पवित्र धडपड आहे.धर्मो रक्षति रक्षितः – जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो, हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.
आजचा दिवस हा केवळ मंत्रालयात जाण्याचा नाही, तर धर्माच्या आवाजाला शासनापर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. हे पाऊल हिंदू समाजाच्या हक्कांसाठी, साधू-संतांच्या गौरवासाठी, आणि सनातन परंपरेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.हे कार्य ईश्वर कृपेने आणि गुरुकृपेने सफल होवो, हीच प्रार्थना. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे
0 Comments