राजकुमार गडकरी
शिर्डी: कोपरगाव तालुक्यातील लक्ष्मीवाडी सावळीविर येथील सोमैया विद्या मंदिरात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनानिमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मारुती धायतडक यांनी भारतीय ज्ञान प्रणाली, आरोग्यशास्त्र आणि योगाचे महत्त्व, मानवी जीवनातील स्थान विशद करून विद्यार्थ्यांनी दैनंदिन योग करावा, योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनावा, असे आवाहन केले. शिक्षक राम ढोकचौळे यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. संस्थेचे सचिव सुहास गाडगे आणि अध्यक्ष समीर सोमैया यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या योग प्रात्यक्षिकामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments