पालखी मध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा पुणे येथे पंडितभाऊ दाभाडे यांच्या हस्ते सत्कार

नंदकुमार बगाडे 
पुणे दि. महाराष्ट्राचे कुलदैवत समजल्या जाणारे देहुगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथील जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि देवाची आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन्ही पालख्या पुणे येथील अरुणा चौक नाना पेठ आणि पालखी चौक भवानी पेठ येथे मुक्कामी असताना या दोन्ही पालख्या मध्ये महाराष्ट्रातील लाखो वारकरी समुदाय सहभागी होत असतो पालखीमध्ये सहभागी झालेल्या बहुजन जनता दल पुणे जिल्हा आणि शहर शाखेच्या वतीने बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पंडित भाऊदाभाडे यांच्या हस्ते दोन हजार वारकऱ्यांचा पालखी चौक भवानी पेठ येथे शाल टोपी श्रीफळ  व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
       पालख्या सोबत येणाऱ्या वारकऱ्यांचा बहुजन जनता दलाच्या जिल्हा व शहरातील कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील विविध भागात दोन दिवस वास्तव असलेल्या वारकऱ्यांचा बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला 
     बहुजन जनता दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज ढमढेरे आणि शहराध्यक्ष महेंद्र मोहोळ सुभाष सुरवाडे जीवन गवळी दीपक निगडे सुभाष पाटील दिलीप मयेकर प्रवीण अहिरे गणेश तांबे तुकाराम कांबळे मोहन आगाशे अनिल अवचट सुभाष खंडागळे किशोर तिवारी मधुकर भावे मंगेश कर्णिक राजेंद्र महल्ले संभाजी काकडे यांच्या हस्ते पुणे शहरातील विविध भागांमध्ये वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला 
  यावेळी संतोष जुवेकर बाबाराव जाधव विजय शिंदे मयूर घोडे रोहित चांदणे वैभव सावळे भगवान इंगळे ध्वनित पाटील दिलीप बिरुटे साहेबराव मोरे यांच्या सह  बहुजन जनता दल महिला आघाडीच्या आणि बहुजन जनता दलाचे पुणे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थितीत होते असे बहुजन जनता दल केंद्रीय मध्यवर्ती कार्यालय कडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments