दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23- शाळांचा वृक्ष संवर्धन कार्यात सहभाग असावा, जैवविविधता विकसित व्हावी म्हणून अभिनव प्रतिष्ठानचे पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कुलच्या प्रांगणात जारूळ, कदंब सह इतर भारतीय प्रजातीच्या झाडांचे रोपण केले.राज्यातील प्रत्येक शाळेत राज्यपुष्प व हरीत मानचिन्ह " जारूळ " चे रोपण करण्याचे कार्य व आवाहन डॉ. पाटील व सामाजिक वनविभाग सिल्लोडचे वन परीक्षेत्र अधिकारी ए. टी. पाटील हे सामाजिक वनविभागाच्या मदतीने करत आहेत. जारूळ बद्दल माहिती असलेल्या क्यू. आर. कोडची रचना डॉ. पाटील यांनी केली असून महाराष्ट्रात असा हा पहिलाच उपक्रम आहे. याचे विमोचन सिल्लोडच्या सामाजिक वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी ए. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जेथे जेथे जारूळ चे रोपण केले.
आहे तेथे हे क्यू. आर. कोडं स्टिकर लावण्यात येत आहेत. स्कॅन केल्यावर मोबाईल मध्ये हा वृक्ष महिमा, जारूळ वर विसंबून असणारी जैववीवीधता ,उपयोग ई. माहिती असलेले सुरेख व रंगीत पोष्टर मोबाईल मध्ये दिसेल.आज लावलेल्या झाडांचे पालकत्व विद्यार्थ्यांनी स्विकारले असून शंभर हुन अधिक झाडे लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.या निमित्ताने शाळेत शासन निर्देशानुसार हरीत सेनेची स्थापना करण्यात आली आहे.यावेळी वन विभागाचे विजय पाटील, गणेश परदेशी, पूजा राजपूत, जनार्धन चाथे, मु. अ. संजीव दौड, कारभारी गोडसे, सपाटे सर, एस जी. गाडेकर आदींची उपस्थिती होती.
0 Comments