दिलीप शिंदे
सोयगाव दि.23- सोयगाव येथील साईवनशा संगणक प्रशिक्षण केंद्र व आरंभ कोचिंग क्लासेस सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 गुरुवारी कुरुक्षेत्र अकॅडमी सोयगाव येथे विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आणि त्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेश गिरी अध्यक्ष सोयगाव तालुका वकील संघ, पॉलिटेक्निक कॉलेज कन्नडचे प्राचार्य श्री संतोष मतसागर , आयटीआय कॉलेज सोयगाव चे प्राध्यापक ठाकूर सर, डॉ. केतन काळे,बार्टी समाजकल्याण समन्वयक बारी, बोराडे सर, अपार सर, शफिक सर, कृषिभूषण अरुण सोहनी, समाज प्रबोधनकार तथा लोककलावंत विष्णू मापारी, कृष्णा जुनघरे, कार्यक्रमाचे आयोजक साईवनशा कम्प्युटर संचालक बिराजी गायकवाड सह संचालक सनी जावरे ,आरंभ कोचिंग क्लासेस सोयगाव चे संचालक प्रा. योगेश काळे व प्रा. प्रणय कुलकर्णी, कुरुक्षेत्र अकॅडमीचे संचालक गजानन साळवे, सहसंचालक संदेश पाईकराव व मार्गदर्शक सचिन ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आरंभ कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा. योगेश काळे यांनी करिअर निवडीचे महत्त्व आणि योग्य मार्गदर्शनाची गरज यावर भर दिला. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी, प्रत्येक क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील व्याप्ती याबद्दल प्राचार्य संतोष मतसागर यांनी सखोल माहिती दिली. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय,संरक्षण अशा अनेक क्षेत्रांतील करिअर पर्यायांवर त्यांनी प्रकाश टाकला.तर प्रा. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील गरजा यांचा विचार करण्याचा सल्ला दिला. तसेच, नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार करिअरमध्ये होणारे बदल आणि त्यानुसार तयारी कशी करावी, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. बोराडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधांबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्न-उत्तर सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्रात विद्यार्थ्यांच्या मनातील करिअर संबंधित अनेक शंका दूर करण्यात आल्या. अध्यक्षीय समारोप करताना ॲड .श्री.राजेश गिरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. साईवनशा कम्प्युटर्सचे सहसंचालक श्री राजेंद्र जावरे यांनी सर्व मान्यवरांचे,मार्गदर्शकांचे, कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक व आयोजकांचे आभार मानले.
0 Comments