अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली !सोमनाथ घार्गे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक!

शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राकेश ओला  यांची बदली  बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे  बदलून आले आहेत.
ते रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. गृह विभागाने राज्यातील 21 पोलीस अधीक्षकांच्या बदलीबाबतचे आदेश गुरूवारी (22 मे) काढले आहे. त्यामध्ये राकेश ओला यांच्या बदलीचा आदेश असून सुमारे अडीच वर्ष राकेश ओला हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे श्रीरामपूर येथे उप पोलीस अधीक्षक होते त्यांना नगर जिल्ह्याची अधिक माहिती असून कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून जिल्हावाशियांना मोठी आशा आहे.

Post a Comment

0 Comments