टाकळीभानच्या याञेत नामवंत पहीलवानांनी गाजवला कुस्तीचा फड, तर हिंदवी पाटील यांच्या आर्केस्ट्राने केला गर्दीचा उच्चांक.

दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान आणि परीसराचे ग्रामदैवत आसलेल्या येथील शंभु महादेवाचा याञा उत्सव अक्षय तृतियेनंतर येणाऱ्या सोमवारी साजरा करण्याची प्रथा रुढ आहे. त्यामुळे ५ मे व ६ मे रोजी पार पडलेल्या या याञा उत्सवात नामवंत पहीलवानांनी व महिला पैहीलवानानी कुस्तीचा फड गाजवला.

 तर राज्यभर गाजत आसलेल्या हिंदवी पाटील स्टेजवर  डान्स करीत असताना  टवाळखोरांकडून स्टेजवर खडे फेकण्यात आली, त्यात त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाल्याने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. शेवटी कार्यक्रमाला गालबोट लागलेच.
               टाकळीभान परीसराचे ग्रामदैवत महादेवाचा याञौत्सव नुकताच ५ व ६ मे रोजी शांततेत पार पडला. तालुक्यातील सर्वात मोठा याञा उत्सव साजरा होत आसल्याची ख्याती आसल्याने दोन दिवस हाऊसफुल गर्दी होत आसते. याञा कमिटी धार्मिक कार्यक्रमा सोबतच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करीत आसल्याने माहेर वासिनी याञेला आवर्जुन हजेरी लावुन ग्रामदैवताचा आशिर्वाद घेतात. त्यामुळे याञेत मोठी आर्थिक उलाढाल होते. लोकसहभागातुन हा याञा उत्सव साजरा होत आसल्याने याञा कमिटी महीणाभर आधीच तयारीला लागलेली आसते.
        यंदा याञा कमेटीने बहारदार करमणुकिच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोमवारी लोकनाट्याच्या कार्यक्रमाला वेळेचे बंधन आल्याने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता सुरु झालेल्या कुस्तीच्या हगाम्याला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्लांनी हजेरी लावल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत फड चांगलाच गाजला. जिल्ह्यातील महीला कुस्तीगिरांनीही फडात उपस्थिती लावुन खेळ दाखवला. सायंकाळी ८ वाजता हींदवी पाटील यांच्या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाने आतापर्यंतच्या गर्दीचे सर्व रेकार्ड मोडुन गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. महीला व पुरुष प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली. 
        याञा कमिटीने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे व श्रीरामपुर  तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी पी एसआय संदीप मुरकुटे ,पी एसआय सतीश  डवले, त्यांच्या सहकार्यांनी याञा उत्सव काळात दोन दिवस चोख बंदोबस्त दिल्याने किरकोळ अनुचित  प्रकार वगळता याञा उत्सव शांततेत पार पडला

Post a Comment

0 Comments