सावळीविहीर येथून द्वारका धाम व गुजरात तीर्थयात्रा दर्शनासाठी यात्रेकरू रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात रवाना,


राजकुमार गडकरी 

.शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथून साई सेवा संघाच्या वतीने आयोजित द्वारका ,सोरटी सोमनाथ, गिरनार पर्वत आदी  तीर्थयात्रा व गूजरात दर्शनासाठी यात्रेकरूंची सहल ही सावळीविहीर बुद्रुक येथील हनुमानजी मंदिरामध्ये दर्शन करून मोठ्या उत्साहात रवाना झाली. 
या यात्रेमध्ये प्रथम सापुतरा, शुक्ल तीर्थ,कुबेर भंडारी मंदिर ,स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदा सरोवर, नीलकंठ धाम, गरुडेश्वरधाम, त्यानंतर  पावागड शक्तीपीठ, डाकोरचे  श्री रणछोडदास मंदिर, राजकोट, सिंधू हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले लोथल, श्री जलाराम बापू विरपुर आश्रम, गिरनार पर्वत, जुनागड, सोरटी सोमनाथ,सासनगीर सिंह अभयारण्य, त्यानंतर माधवपुर, पोरबंदर हर्षदा माता, द्वारका बेट, द्वारका , अहमदाबाद ,बडोदा अशी तीर्थयात्रा होणार असून या यात्रेमध्ये सुनील आगलावे, राजकुमार गडकरी, सतीश जपे, रावसाहेब एखंडे,  नामदेव चव्हाण,आदीं यात्रेकरू कुटुंबासह सहभागी झाले आहेत. यात्रे करूनां निघताना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. साईसेवा संघाच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विविध  तीर्थस्थानसाठी सहल आयोजित केली जाते. मागील वर्षी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ अशी ट्रिप आयोजित केलीली  असून  तीर्थयात्रेसाठी सावळी विहीर येथून रविवारी सकाळी यात्रेकरू मोठ्या उत्साहात रवाना झाले.

Post a Comment

0 Comments