दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.03 - दरवर्षी उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत आहे. कोपर्णिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अभ्यासानुसार 2024 चा उन्हाळा या शंभर वर्षातील सर्वात उष्ण उन्हाळा ठरला. दर वर्षात उन्हाळा 10 ते 15 दिवस आधी सुरु होतोय तर 10 ते 14 दिवस उशीरा संपत आहे.
--का ओकत आहे सूर्य आग------ सूर्यापासून निघणारे सत्तर टक्के अल्ट्रा व्हायलेट 'अ 'व 'ब ' हे किरणं व उष्णता पृथ्वीच्या वरील आवरणताच विशेषतः ओझोन च्या थरामुळे अडवली जातात. मात्र वाहणांचे प्रदूषण,औद्योगिक वायू प्रदुषकं, जंगलांना लावणारे वणवे, प्लॅस्टिक जाळने आदी मुळे निर्माण होणारे कॉर्बन डाय ऑक्साईड सारखे हरितगृह वायू यामुळे ओझोन थरास नुकसान होत असून त्यामुळे पृथ्वीवर 30 टक्के हुन अधिक सौर उष्मा व अतिनील किरणे प्रभाव टाकत अस ल्याने उन्हाळ्याची तीव्रता व कालावधी वाढत आहे. त्यातच वृक्ष तोडी मुळे व पुरेसे वृक्ष न लावल्या मुळे हे हरितगृह वायू पुरेसे शोषले जात नाही परिणामी परत जागतिक तापमान वाढीचे मानवी जीवन व वन्यजीवन, पर्यावरण यावर भीषण परिणाम होऊ लागले आहेत. --वृद्धांना ग्रासत आहे त्वचेचा " बासल सेल कार्सिनोमा" हा कर्करोग-- सिल्लोड येथील या विषयाचे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी या 15 वर्षात 60 हुन अधिक वृद्धांमध्ये बासल सेल, स्क्वामससेल व मॅलिगन्ट मेलानोमा या मानवी त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर - ज्या जागी सर्वाधिक उन्ह पडते तेथे, हे आजार नोंद केले आहेत. या 10 वर्षात या आजाराचे प्रमाण तुलनेने वाढले आहे असं " जर्नल ऑफ क्लीनिकल अँड डायग्नो स्टिक रिसर्च यामध्ये विषद करण्यात आले आहे.
--उन्ह का ठरत आहे तापदायक--- मानवी चेहऱ्यावरील किंवा जेथे अधिक सूर्यप्रकाश पडतो तेथील त्व चेतील केरॅटिनोसाईट या पेशीतील सेल्यूलर डी. एन.ए.मध्ये जनुकीय बदल होऊन त्वचेत 3 प्रकारचे कर्करोग होतात. या मागे वाढते उन्ह हे मुख्य कारण आहे.मानवा प्रमाणे काही सस्तन प्राण्यांना मोतीबिंदुचे प्रमाण नैसर्गिक रित्या होणाऱ्या तुलनेत कित्येक पट वाढले आहे.---
डॉ. संतोष पाटील, पर्यावरण अभ्यासक, सिल्लोड-सोयगाव
0 Comments